Punyanagari epaper
अकोला अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकोल्हापूर जळगावधुळेनागपूर नांदेडनाशिकपुणेमुंबई लातूरसातारासोलापूर Archive Archives
21 March, 2017,Tuesday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
7
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*चार महिन्यांत पीक देणार्‍या कापसाची जात विकसित

*पोस्को कंपनी गेली तर दुसरी येईल - गोयल

*दोन्ही कंपन्यांमधील कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या सुरक्षित

*भारतात मोठी संधी - पारेख

*पोस्टाच्या बँक खात्यासाठी किमान शिल्लक फक्त ५0 रुपये

*जेके टायर्सची ट्रक रेसिंगसोबत भागीदारी

*शेअर बाजारातील निवडणुकीनंतरची तेजी खंडित

*विमानभाड्यावर नियंत्रण घालावे - संसदीय समिती

*कोकम, नाशिक वाईन आणि महाबळेश्‍वर स्ट्रॉबेरीला जीआय मानांकन

*बीटी कॉटन बियाणांचे दर घटवण्याची मागणी ?नवी दिल्ली : कापसाच्या कमी उत्पादकतेमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, यासाठी बीटी कॉटनच्या बियाणांचेदर घटण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेल्या ‘स्वदेशी जागरण मंच’ने केली आहे. सध्या असलेले बीटी कॉटन कापसाच्या बियाणांचे दर २५ रुपयांनी घटवण्याची मागणी मंचकडून करण्यात आली आहे आणि यासंदर्भात मंचकडून केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांना पत्र लिहिण्यात आले आहे. बीटी कॉटनच्या गुणमूल्यात कपात करून याची किंमत ७७५ रुपये निश्‍चित करण्याची मागणी मंचने केली आहे. मंत्री महोदयांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी या दिशेने पावले उचलावीत, असे आव्हान मंचचे राष्ट्रीय सहसमन्वयक अश्‍वनी महाजन यांनी केले आहे. यंदा राष्ट्रीय औष्णिक ऊज्रेची विक्रमी निर्मिती ?नवी दिल्ली : राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २६३.९५ अब्ज युनिट इतकी विक्रमी ऊर्जा निर्मिती केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या प्रमाणात ४.७१ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीही महामंडळाने २६३.४२ अब्ज युनिट इतक्या विक्रमी ऊर्जा निर्मितीची नोंद केली होती. सध्या महामंडळाच्या कोळशावर आधारित १९, वायूवर आधारित ७, सौर ऊज्रेवर आधारित १0, औष्णिक ऊज्रेवर आधारित १ आणि संयुक्त उपक्रमातल्या ९ प्रकल्पांच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती सुरू आहे. टेक्सटाईल पार्कसाठी ९३ हेक्टर जमीन राखीव ?यवतमाळ (महाराष्ट्र): महाराष्ट्र सरकारने टेक्सटाईल पार्कसाठी लोहारा एमआयडीसीमध्ये ९३ हेक्टर जमीन आरक्षित केली आहे. या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी संबंधित विभाग व जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांची बैठक १६ मार्चला मंत्रालयात झाली. या बैठकीची अध्यक्षता ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर यांनी केली. यवतमाळ एमआयडीसी क्षेत्रात टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची योजना खूप काळापासून प्रलंबित आहे. लोहारा एमआयडीसीत ९३ हेक्टार जमीन आरक्षित करण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहेत आणि हे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर यांनी मीडियाशी बोलताना दिली. भारत-कोरिया दुहेरी कर टाळण्यासाठी करार ?नवी दिल्ली : भारत-कोरिया यांच्यातील सुधारित दुहेरी कर निर्धारण टाळण्यासंदर्भातील करारानुसार २0१७-१८ या आर्थिक वर्षापासून कोरियातील सहकारी कंपन्यांसोबत सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाणी संदर्भातील आवेदने विहित नमुन्यात सादर करावे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सांगितले आहे. आयकर अधिनियम १९६१च्या कलम ९२ सीसी (९अ) अंतर्गत यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. २0१७-१८ या वित्तीय वर्षात आवेदन पत्रे सादर करण्यासंदर्भात करदात्यांनी केलेल्या विचारणांना अनुसरून प्रत्यक्ष कर मंडळाने हे स्पष्टीकरण दिले आहे. फ्युचर जनरालीची युको बँकेबरोबर भागीदारी ?मुंबई : भारतातल्या रिटेल व्यापाराला नवा आयाम देणारा उद्योगसमूह अशी ओळख असणार्‍या फ्युचर ग्रुप आणि जनराली या १८६ वर्षे जुन्या आणि जगातल्या ५0 मोठय़ा कंपन्यांमध्ये मोजदाद होणार्‍या जागतिक विमा समूहाची संयुक्त भागीदारी असणार्‍या फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) या विमा कंपनीने भारत सरकारच्या मालकीच्या व्यावसायिक बँकांपैकी एक असणार्‍या युको बँकेशी कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून युको बँकेच्या ३0५0 शाखांमधून फ्युचर जनराली आपली आरोग्य आणि पीए, मोटर, पर्यटन, गृह आणि ग्रामीण विम्याची उत्पादने विक्रीसाठी सादर करणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाताच्या दुर्मिळ वाणांची शेती सुरू ?श्रीनगर : काश्मीरमधील कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी १0 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर भाताचे सुगंधित वाण ‘मुश्कबुदजी’ची शेती पुन्हा सुरू झालेली आहे. ही भाताची वाण फक्त डोंगराळ दर्‍याखोर्‍यातच पिकत असते. शेतकर्‍यांना या दुर्मिळ वाणांची शेती मोठय़ा प्रमाणावर करण्याला जम्मू-काश्मीर राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. जम्मू-काश्मीरच्या अँग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन (एआयडीसी)च्या एक अधिकार्‍याने म्हटले आहे की, कृषी वैज्ञानिकांच्या संशोधन आणि ४00 शेतकर्‍यांच्या सहकार्याने मुश्कबुदजी तांदळाचे मागील वर्षी मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झाले. जे शेतकरी अशा वाणांची शेती करत आहेत, अशा शेतकर्‍यांना एआयडीसी मार्केटिंग पाठिंबा उपलब्ध करून देत आहेत. मागील वर्षी भाताच्या या दुर्मिळ पद्धतीच्या शेती जवळपास १२५ हेक्टरमधील क्षेत्रात करण्यात आली आणि एकूण ९00 टनाचे उत्पादन झालेले आहे.
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart