Punyanagari epaper
अकोला अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकोल्हापूर जळगावधुळेनागपूर नांदेडनाशिकपुणेमुंबई लातूरसातारासोलापूर Archive Archives
21 April, 2017,Friday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
14
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*समांतर प्रतिष्ठानच्या कवी संमेलनास उत्तम प्रतिसाद

*गडकरी रंगायतनच्या दर्शनी भागातील पुतळय़ांना नवा साज!

*१२ लाखांचे तेल परस्पर विकणार्‍यास अटक ? ठाणो : ठाण्यातील एका व्यावसायिकाच्या गोदामातून सूर्यफुलाच्या तेलाचा साठा परस्पर विकून १२ लाखांची अफरातफर करणार्‍या कर्मचार्‍यास श्रीनगर पोलिसांनी अटक केली.ठाण्यातील नितीन नाक्याजवळ राहणारे दिनेश शाह यांचा सूर्यफुल तेल आणि मसाले विक्रीचा व्यवसाय आहे. किसन नगरातील पॅराडाइस इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील गोदामात त्यांनी मालाचा साठा केला होता. या मालाचा व्यवहार सांभाळण्यासाठी दिघा येथील श्रेणिक ऊर्फ सनी सेठ (जैन) हा त्यांच्याकडे कामावर होता. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सनी सेठ याने १२ लाख रुपयांचे तेल आणि मसाले कळवा, खारेगाव आणि दिवा परिसरातील दुकानदारांना विकले. मालाच्या मोबदल्यात मिळालेली संपूर्ण रक्कम त्याने हडपली. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर दिनेश शाह यांनी श्रीनगर पोलिसांकडे सोमवारी तक्रार दिली. महिलेची पर्स खेचली ? अंबरनाथ : अंबरनाथहून बदलापूरला जात असलेल्या इसमाच्या मोटारसायकलला लाथ मारून त्याच्या पत्नीच्या हातातील पर्स खेचून नेल्याचा प्रकार अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावरील अँरोमॅटिक कंपनीसमोर घडला. उल्हासनगर येथे राहणारे मनीष वासवानी (३१) रात्री १0.१५ च्या सुमारास मोटारसायकलवर पत्नीसह उल्हासनगरला जात होते. ते अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावरील अँरोमॅटिक कंपनीसमोरून जात असताना तीन अज्ञातांनी त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारून पत्नीच्या हातातील पर्स खेचली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे अधिक तपास करत आहेत. प्राणायाम वर्ग ? ठाणो : विवेकानंद केंद्र कळवातर्फे पाच दिवसांचे प्राणायाम वर्ग १७ ते २१ एप्रिलदरम्यान सकाळी १0 ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले आहेत. इच्छुकांनी केंद्रात सुषमा हुबळीकर यांच्याशी संपर्क साधावा.

*उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय कात टाकणार
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart