Punyanagari epaper
अकोला अमरावतीअहमदनगरऔरंगाबादकोल्हापूर जळगावधुळेनागपूर नांदेडनाशिकपुणेमुंबई लातूरसातारासोलापूर Archive Archives
21 April, 2017,Friday About Us Advertisement Rate Contact Us Feedback
Search
Search
.
Previous
Pages: 
7
Previous
हेडलाईन See in pdf format Newspaper view Print Email Comment

*महाराष्ट्रातील १८ कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

*सेन्सेक्स निर्देशांक ८५ अंक उसळला

*टाटांच्या ताज मानसिंगचा अखेर लिलाव

*ओपेक राष्ट्रे खनिजतेल उत्पादन कपातीस मुदतवाढ देतील

*अर्थसहाय्याचा मार्ग मोकळा

*कोंढवा येथे बँक ऑफ बडोदाचे नवे किऑस्क

*मतदान पावती देणार्‍या ईव्हीएम मशीन खरेदीस मंजुरी

*टाटा मोटर्सने सादर केली क्लचमुक्त बस ?नवी दिल्ली : व्यावसायिक वाहन बनवणारी कंपनी टाटा मोटर्सने ऑटोमेटेड मॅनुअल ट्रान्समिशन (एएमटी) तंत्रज्ञानावर आधारित बस सादर केली आहे. कंपनीने आपल्या स्टारबस अल्ट्रा श्रेणीच्या अंतर्गत बाजारात उतरवल्या आहेत. दिल्लीच्या शोरूममध्ये त्याची किंमत २१ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. एएमटी तंत्रज्ञानाच्या वाहनामध्ये क्लचची आवश्यकता नसते. अशा वाहनांमध्ये फक्त अँक्सिलरेटर आणि ब्रेक पॅडल असतात. यामुळे चालकाला सहज गीअर बदलण्यास सोपे जाते आणि गाडी चालवणे अधिक सुरक्षित तथा आरामदायक होते. या बसेस शहरासाठी बनवण्यात आलेल्या असून या अनेक रंगात उपलब्ध आहेत, असे परिपत्रकात म्हटले आहे. या तंत्रज्ञानाचा विकास वेबकोने केलेला असल्याचे कंपनीच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय विभागाचेकार्यकारी संचालक रवी पिशारोडी यांनी येथे म्हटले आहे. दुहेरी कर टाळण्यासाठी भारत-पोतरुगाल करार ?नवी दिल्ली : दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत आणि पोतरुगालदरम्यान राजशिष्टाचारविषयक नियमांत बदल करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीमुळे प्राप्तिकरावरच्या करासंदर्भात होणारी वित्तीय चोरीसुद्धा रोखता येऊ शकेल. हा करार अस्तित्वात आल्यावर, भारत आणि पोतरुगालदरम्यान करविषयक माहितीचे आदानप्रदान होऊ शकेल. यातून दोन्ही देशांतील कर अधिकार्‍यांना करचोरीला आळा घालणो शक्य होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने रेकॉर्ड वेळेत पूर्ण केला इथेन प्रकल्प ?नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गुरुवारी जगातील सर्वात मोठय़ा इथेन प्रकल्पाचे कामकाज सुरू केले आहे. कंपनीने या सर्वात अवघड असणार्‍या प्रकल्पाचे उभारणी कार्य रेकॉर्ड वेळेत केले आहे. जवळपास १.५ अब्ज डॉलरच्या खर्चातून तयार झालेला हा प्रकल्प गुजरातमधील दाहेज पेट्रोरसायन परिसरात आहे. या कामगिरीबद्दल सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे काम त्यांनी तीन वर्षांपेक्षाही कमी रेकॉर्ड वेळेत पूर्ण केले आहे. कंपनी मोठय़ा प्रमाणांत उत्तरेकडील अमेरिकेतून इथेनची आयात करणार आणि याचा उपयोग पेट्रोरसायनच्या उत्पादनार करेल, असे कंपनीने एका परिपत्रकात म्हटले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तरेकडील अमेरिकेत शेल गॅसचा गोंधळ झाल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर इथेनचे उत्पादन होते. सेंद्रीय कृषी उत्पादनांच्या निर्यात नियमात सूट ?नवी दिल्ली : सरकारने गुरुवारी काही सेंद्रीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांत उदा. गहू, बासमती नसलेला साधा तांदूळ इत्यादीच्या निर्यातीवर लावलेल्या अंकुशांमध्ये सूट दिली आहे. अशा उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे. विदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी)ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, सेंद्रीय कृषी तथा प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचा उदा. गहू, बिगर बासमती तांदूळ, खाद्यतेल, साखरेला सध्याच्या प्रमाणाच्या हिशोबाने र्मयादेत सूट देण्यात आली आहे. याशिवाय सेंद्रीय कडधान्य व डाळीच्या निर्यातीची वार्षिक र्मयादाही सध्याच्या १0,000 टनावरून वाढून ५0,000 टन करण्यात आली आहे. भारतात पेटंट नोंदणीकरणात वाढ - रिपोर्ट ?नवी दिल्ली : भारतात २0१३-१५ च्या काळात प्रकाशित पेटंटच्या संख्येत २६ टक्क्यांची उच्च वृद्धी नोंदवण्यात आलेली आहे. क्लॅरिवेट अँनालिटिक्सच्या एका रिपोर्टनुसार या कालावधीत भारतात सर्वात जास्त पेटंट कॉम्प्यूटिंग, औषध, टेली कम्युनिकेशन्स आणि पॉलीमर तथा प्लॅस्टिक क्षेत्रात नोंदवण्यात आलेले आहेत. आशियाई देशांत भारताची वृद्धी या आयटममध्ये जास्त नोंदवण्यात आलेली आहे. टाटा मोटर्सला वाहनांच्या विक्रीत वाढीची आशा ?मुंबई : चालू वर्षी जीएसटी करव्यवस्था लागू होऊ शकते आणि पाऊसही उत्कृष्ट राहण्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने टाटा मोटर्सला अर्थिक वर्ष २0१७-१८ मध्ये लाईट व्यावसायिक वाहने आणि बसेसची विक्री १0 ते १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची आशा आहे. कंपनी चालू वर्षात बस बाजारात ऑटोमेटिक मॅन्युअल ट्रान्समिशनची नवीन श्रेणी सुरू करेल, जी याच्या तंत्रज्ञानावर आधारित प्रीमियम पिकअप जीनॉनपेक्षा वेगळी असेल. कंपनीच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय युनिटचे कार्यकारी निदेशक रवी पिशारोडी मीडियाशी बोलताना म्हणाले की मागील आर्थिक वर्षात आम्ही लाईट व्यावसायिक वाहन श्रेणीत बाजाराच्या सरासरी वृद्धी दराने दुप्पट वृद्धी नोंदवलेली आहे. ही २२ टक्के इतकी आहे.

*उद्योगाच्या गरजेनुसार सरकारी धोरणांच्या समीक्षेची आवश्यकता - अन्सारी
Contact Us | About Us | Advertise with Us
Copyright© 2011 Punyanagari epaper
Designed & Developed by: Ezinemart