जॅम आणि चहाच्या विक्रीतून मिळणारा संपूर्ण नफा ‘मलाला फंड’ला देण्याची घोषणा
लंडन : Meghan Markle Malala Fund Donation : ब्रिटनच्या ससेक्स डचेस मेगन मार्कल आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मानवाधिकार कार्यकर्त्या मलाला युसूफझाई गेल्या आठवड्यात लंडनमधील प्रसिद्ध ‘क्लॅरिजेस’ हॉटेलमध्ये एकत्र चहा घेताना दिसल्या होत्या. या दोघींच्या भेटीमागचे कारण काय असावे, याबाबत जगभरात तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर या भेटीमागील मोठे कारण समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, मेगन मार्कलने तिच्या ‘ॲझ एव्हर’या ब्रँडच्या जॅम आणि चहाच्या विक्रीतून मिळाणारा शंभर टक्केनफा मलाला फंडला देणगी म्हणून देण्याची घोषणा केली आहे. मेगनने तिच्या इन्स्टाग्रामवरील ४९ लाख फॉलोअर्ससाठी मलालासोबत चहा पितानाचे आणि एकमेकींना मिठी मारतानाचे फोटो शेअर केले आहेत.
मलाला युसूफझाई यांच्या नावाने चालवला जाणारा हा फंड जगभरातील मुलींना मोफत, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी काम करतो.
चॅरिटीसाठी जंपर आणि इतर घडामोडी
चॅरिटी जंपर : बालिका दिनानिमित्त मेगनने ‘आर्चीवेल’ फाऊंडेशन आणि ‘मम्स ऑफरिंग मोर’ या संस्थेच्या संयुक्त सहकार्याने ७५ पौंडांचे एक विशेष जंपर लाँच केले आहे. या जंपरवर ‘इट्स द लिटल थिंग्स’असा संदेश लिहिला आहे, जो एका सिंगल मदरच्या वडिलांच्या अखेरच्या शब्दांशी जोडलेला आहे.
ब्रिटनमध्ये उत्पादनांची विक्री: मेगनचे ‘ॲझ एव्हर’ ब्रँडचे चहा, सुवासिक मेणबत्त्या आणि तिच्या स्वत:च्या हस्ताक्षरातील बुकमार्क लवकरच ब्रिटनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, अन्न आयात नियमांमुळे तिचा जॅम ब्रिटनमध्ये विकला जाणार नाही.
Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.