Ad Advertisement Ad Advertisement

MSRTC Strike 2026 : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा, मागण्या पूर्ण न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन

वेतन वेळेवर देण्यासह ६० टक्के महागाई भत्ता आणि १५ हजार रुपये दिवाळी बोनसची मागणी; मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा

मुंबई : MSRTC Strike 2026 महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी बस) कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यव्यापी संपाचा थेट इशारा दिला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास ६ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संपावर जाण्याची अधिकृत नोटीस कर्मचाऱ्यांनी दिली असून, याबाबतचे निवेदन थेट मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या काय आहेत प्रमुख मागण्या

एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे प्रामुख्याने आर्थिक आणि प्रलंबित भत्त्यांबाबत मागण्या केल्या आहेत

  • वेळेवर वेतन : दर महिन्याच्या ७ व्या तारखेपूर्वी सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे.
  • महागाई भत्ता : कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करून त्यांना ६० टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा.
  • दिवाळी बोनस: ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळण्यासाठी यंदाच्या दिवाळीला प्रत्येक कर्मचाऱ्याला १५,००० रुपये बोनस देण्यात यावा.

Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.