Ad Advertisement Ad Advertisement

Shivaji Maharaj Drought Management Farmer Welfare – 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळ कसा संपवला होता? उपाय वाचून व्हाल थक्क..!

Shivaji Maharaj Drought Management Farmer Welfare – महाराष्ट्राच्या मातीला एक इतिहास आहे. हा इतिहास संघर्षाचा आहे, संकटांशी लढण्याचा आहे. दुष्काळामुळे आज आपला बळीराजा पुन्हा एकदा संकटात आहे. आभाळ फाटलंय, जमीन सुकलीये आणि दुष्काळाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय.पण थांब बळीराजा… खचून जाऊ नकोस! ज्या मातीत आपण जन्मलो, तिथे ३५० वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला. ज्याने आपल्याला रडायला नाही लढायला शिकवलं.. होय बरोबर ओळखलं तुम्ही.. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!

दुष्काळाचे संकट शिवरायांच्या काळातही आले होते. सुलतानी आस्मानी संकटं आली होती. पण शिवरायांचा शेतकरी कधी फासावर लटकला नाही. त्याने कधी आत्महत्या केली नाही. का? कारण त्याचा राजा त्याच्या पाठीशी खंबीर उभा होता! आज शिवरायांचे तेच विचार आपल्याला या दुष्काळातून बाहेर काढणार आहेत.

आज महाराष्ट्राच्या मातीची धग बघा. ऊर फाटलाय जमिनीचा. धरणं कोरडी, विहिरी कोरड्या पडल्यात. डोळ्यासमोर पिकांची होळी झाली. पण याहून भयानक काय? तर आमचं शासन आणि प्रशासन! दुष्काळ पडल्यावर वातानुकूलित (AC) गाड्यांमधून दौरे निघतात. पंचनाम्याचे कागद हवेत उडतात. शेतकरी बँकेच्या नोटिसांनी आणि कर्जाच्या ओझ्याने बेजार झालाय.पण ही लाचारी कधीपर्यंत सहन करणार? आज घोषणांचा पाऊस पडतोय, पण शेतकऱ्याच्या शेतात पाण्याचा थेंब नाही. ही व्यवस्था बदलण्याची ताकद कुणात असेल, तर ती फक्त आणि फक्त शिवरायांच्या विचारांमध्येच आहे!”

“शिवाजी महाराज म्हणजे केवळ ढाल-तलवार नाही, तर संकटसमयी रयतेची ढाल बनणारा बाप माणूस! १६७७ च्या भीषण दुष्काळात शिवाजी महाराजांनी काय केले होते?

१. जमीन महसूल आणि कर प्रणालीत सुधारणा (मलिक अंबर पद्धतीची अंमलबजावणी)

महाराजांनी सत्तेवर आल्यावर सर्वात आधी जाचक कर पद्धती बंद केली. त्यांनी जमिनीची मोजणी करून घेतली.नियम असा होता: पिकाची पाहणी करून शेतसारा (tax) ठरवला जायचा. जर दुष्काळामुळे किंवा अवकर्षणामुळे पीक आलेच नाही, तर कर १००% माफ केला जायचा.
आजच्या काळात दुष्काळ पडल्यावरही बँकेचे हप्ते किंवा वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जातो. शिवरायांच्या काळात अधिकाऱ्यांना सक्त ताकीद होती की, दुष्काळात शेतकऱ्याकडून एका पैचीही सक्तीची वसुली करायची नाही!

२. ‘तगाई’ योजना (शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज)

आजच्या भाषेत ज्याला आपण Crop Loan किंवा कृषी कर्ज म्हणतो, त्याची सुरुवात शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी ‘तगाई’ या नावाने केली होती.
दुष्काळात जेव्हा शेतकऱ्याकडे पुढच्या पेरणीसाठी पैसे नसायचे, तेव्हा सरकार स्वतः शेतकऱ्याला बी-बियाणे, खते आणि बैलजोड्या खरेदी करण्यासाठी रोख रक्कम द्यायचे.

वैशिष्ट्य म्हणजे: हे कर्ज संपूर्णपणे बिनव्याजी (0% Interest) असायचे. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला कोणतीही घाई केली जात नसे. जेव्हा पिके चांगली येतील आणि शेतकरी सुखात असेल, तेव्हाच तो सोयीनुसार हे पैसे परत करायचा.

३. सरकारी धान्याची कोठारे (अन्न सुरक्षा योजना)

शिवरायांनी स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावर आणि मुख्य ठाण्यांवर ‘धान्याची मोठी कोठारे’ उभारली होती.
चांगल्या पावसाच्या वर्षात शेतकाऱ्यांकडून खरेदी केलेले किंवा कराच्या रूपाने आलेले धान्य या कोठारांमध्ये साठवून ठेवले जाई.
जेव्हा दुष्काळ पडायचा, तेव्हा महाराज या कोठारांची दारे रयतेसाठी खुली करायचे. कोणत्याही मावळ्याला अन्नावाचून मरावे लागू नये, ही त्यामागची भूमिका होती. आजची रेशनिंग (PDS) व्यवस्था ही याच शिवकालीन विचारांवर आधारित असायला हवी.

४. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चे शिवकालीन मॉडेल

दुष्काळाचा कायमस्वरूपी पाडाव करण्यासाठी महाराजांनी जलव्यवस्थापनावर (Water Management) प्रचंड भर दिला.
त्यांनी डोंगरउतारांवर पाण्याचे लहान-लहान तलाव बांधले. किल्ल्यांवर दगड फोडून पाण्याच्या टाक्या तयार केल्या, जेणेकरून पावसाचे पाणी वाया जाणार नाही.

गावागावांत विहिरी आणि बंधारे बांधून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचे प्रयत्न केले. महाराजांचा नियम होता ‘ज्या गावची शिवारात पाणी, त्या गावचा शेतकरी कधीच नाही उपाशी!’

५. फळबागा आणि वृक्षलागवड योजना

केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून शिवरायांनी फळबागांना प्रोत्साहन दिले.
आंबे, फणस, नारळ, आणि सुपाऱ्यांची झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना पडीक जमिनी मोफत दिल्या गेल्या.

महाराजांचा हुकूम होता की, रयतेची झाडे ही सरकारी मालमत्ता नसून ती वाढवणाऱ्या शेतकऱ्याची आहेत. झाडे तोडण्यावर कडक निर्बंध होते, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत व्हायची.”

“आजच्या सत्ताधाऱ्यांनो, शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करता ना? मग शिवरायांसारखं काळीजही ठेवा! शिवरायांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ठणकावून सांगितलं होतं- ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर रयत म्हणेल मोगल बरे होते!’ आजच्या सरकारनेही नोकरशाहीला असाच वचक दाखवला पाहिजे.

दुष्काळ काळात सरकारी अनुदान अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाणीव करून द्या, तुम्ही रयतेची सेवक आहात मालक नाही! सर्वात महत्त्वाचे तात्पुरते टँकरचे राजकारण बंद करून, शिवरायांसारख्या कायमस्वरूपी जलयोजना राबवा! हे जर सरकार करत नसेल, तर शिवरायांची रयत म्हणून आपल्याला आपला हक्क मिळवण्यासाठी शासनाविरुद्ध लढावे लागेल. तरच आपल्याला शिवरायांचे मावळे म्हणून घेण्याचा अधिकार आहे.

“माझ्या शेतकरी बांधवा, तुझा जन्म मरण पत्करण्यासाठी नाही, तर संकटांवर मात करण्यासाठी झालाय. जेव्हा जेव्हा मन खचेल, डोळ्यात पाणी येईल, तेव्हा एकदा शिवरायांना डोळ्यासमोर आण. महाराज काय म्हणायचे? ‘राज्य रयतेचे आहे.’ तुम्ही या मातीचे मालक आहात, या देशाचे पोशिंदे आहात. मालक कधी आत्महत्या करत नसतो! परिस्थिती आज कठीण आहे, पण तुझा आत्मविश्वास त्याहून मोठा आहे. शिवरायांचा मावळा कधीही संकटासमोर गुडघे टिकत नाही!”

“शेतकरी राजा, ऊठ! डोळ्यातलं पाणी पुस आणि हाताची मूठ घट्ट कर. हा दुष्काळ तात्पुरता आहे, तुझा बाणा कायमस्वरूपी आहे. ज्या मातीत शिवरायांचे विचार आहेत, ती माती कधीही वांझ राहू शकत नाही. तुझी कष्टाची घामे गाळलेली जमीन पुन्हा हिरवीगार होणार, तुझ्या गोठ्यात पुन्हा बैलजोडी उभी राहणार आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा तेच राजेपण येणार!

घाबरू नकोस, लढ! सरकारला जाब विचार, हक्कासाठी समोर ये. तुझा राजा आजही तुझ्या विचारांत जिवंत आहे.हा व्हिडिओ प्रत्येक त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा ज्याचा आत्मविश्वास डगमगतोय. त्याला सांगा- ‘लढायचंय आणि जिंकायचंय!’आजच्या व्हिडिओची फायनल कन्क्लूजन वन लाईन.. दुष्काळ पाण्याचा पडलाय.. शिवरायांचे विचार आत्मसात करणाऱ्या मावळ्यांचा नाही..

Read About: Maharashtra Drought Crisis – संधी नव्हे, संकटाचे आव्हान!

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.