Ad Advertisement Ad Advertisement

Illegal Sutli Bomb Factory in Latur : सुतळी बॉम्बच्या कारखान्यावर छापा – 2026

महिला कामगारांसह मुकादम ताब्यात

Illegal Sutli Bomb Factory in Latur लातूर: तालुक्यातील ममदापूर येथे शेतात सुरू असलेल्या बेकायदेशीर सुतळी बॉम्ब निर्मितीच्या कारखान्यावर लातूर पोलिसांनी छापा टाकून तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले बॉम्ब आणि निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि.१९) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी महिला कामगारांसह मुकादमाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ममदापूर येथील चंद्रकांत धनवे यांच्या शेतातील रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व परिसरात सुतळी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले सुतळी बॉम्ब, सुतळी, कागद, सल्फर तसेच बॉम्ब निर्मितीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. यावेळी सहा महिला कामगार आणि मुकादम लिंबराज गणपती मोरे (४२, रा. ममदापूर, ता. लातूर) हजर होते.

प्राथमिक चौकशीत या कारखान्याचा मालक म्हणून आसीफ रसूल शेख (३२, रा. ताजुद्दीन बाबा दर्गा रोड, आंबेडकर चौक, लातूर) यांचे नाव समोर आले. सुतळी बॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक परवान्याबाबत चौकशी केली असता, संबंधितांकडे परवाना नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आवश्यक परवान्यांची पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

आवश्यक उपाययोजना अपुऱ्या

स्फोटक पदार्थ हाताळण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, संरक्षक साधने आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना प्रथमदर्शनी अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रमेश चव्हाण, व्यंकटेश कुलकर्णी, लक्ष्मण आरदवाड, गणेश वनामी, पूनम शेटे, रूपाली भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read about : France Farmer Relief Package : फ्रान्स सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 1 अब्ज युरोचे पॅकेज

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.