सीईओ आणि वकिलांचे हुबेहूब आवाज व चेहरे तयार करण्यासाठी एआयचा वापर; स्पेन, ब्रिटन, इस्रायल आणि यूएईशी संबंधित आरोपींवर न्यूयॉर्कमध्ये गुन्हे दाखल
न्यू यॉर्क (अमेरिका) : AI CEO Impersonation Scam कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून नामांकित कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि वकिलांचे बनावट रूप (अवतार) धारण करून १२९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १,०७० कोटी रुपये) हडपणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा न्यू यॉर्कमधील न्यायालयात पर्दाफाश झाला आहे. या सायबर गुन्हेगारी प्रकरणी जेकब सोएल (४१), शेरॉन हझान (५४) आणि गाय शीट्रीट (४२) या तिघांवर विविझ आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळात स्पेन, ब्रिटन, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) या आरोपींनी जगभरातील हजारो कंपन्यांना आपल्या जाळ्यात ओढले.
बळी पडलेल्या प्रमुख संस्था
मिसूरी आणि कॅलिफोर्नियातील रुग्णालय व्यवस्थापन, ऱ्होड आयलंडमधील एक बँक, ब्रिटनमधील फिनटेक कंपनी, मॅसेच्युसेट्समधील म्युच्युअल फंड कंपनी आणि फ्लोरिडामधील पेट फूड कंपनीला या टोळीने गंडा घातला. जून ते सप्टेंबर दरम्यान या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींपैकी शेरॉन हझान याला २००८ मध्येही बँक फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यू यॉर्क न्यायालयाने दोषी ठरवले होते. AI CEO Impersonation Scam
फसवणुकीची अनोखी पद्धत
- या तिघांची रॉकी बाल्बोआ, सुपरमॅन कॅश आणि फॅट बॉय अशी टोपणनावे होती. ते सर्वप्रथम कंपनीच्या हिशेब (अकाउंट्स) विभागाला लक्ष्य करायचे आणि सीईओच्या नावाने एक गोपनीय आर्थिक व्यवहाराचा ई-मेल पाठवायचे. AI CEO Impersonation Scam
- ई-मेलनंतर ते फोन किंवा व्हिडिओ कॉल करायचे. यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सीईओचा हुबेहूब आवाज आणि कधीकधी चेहरा दाखवून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करायचे.
- त्यानंतर कर्मचाऱ्याला एका मोठ्या विधीविषयक फर्मच्या वकिलाशी बोलण्यास सांगितले जायचे. आरोपी जेकब सोएल हा ब्रिटीश वकिलाचे बनावट रूप घ्यायचा. त्याच्याकडे वकिलासारखे बोलण्यासाठी एक हस्तलिखित स्क्रप्टि तयार असायचे.
- कर्मचाऱ्याने परदेशातील बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यावर, ते पैसे पकडले जाऊ नयेत म्हणून लगेचच क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतरित केले जायचे AI CEO Impersonation Scam
एफबीआयचा इशारा
गुन्हेगार आता प्रगत तंत्रज्ञानाचा शस्त्रासारखा वापर करत आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना उघडे पाडण्यासाठी एफबीआय पूर्णपणे सज्ज आहे, असे एफबीआयचे सहाय्यक संचालक जेम्स सी. बार्नॅकल ज्युनिअर यांनी सांगितले.
आरोपींना होऊ शकते २० वर्षांची शिक्षा
आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाल्यास, बनावट रूप धारण केल्याच्या गुन्ह्यासाठी २ वर्षांची आणि उर्वरित प्रत्येक गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Read About : Russell Brand Guilty of Rape – रसेल ब्रँड बलात्काराच्या गुन्ह्यांत दोषी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.