Advertisement Advertisement

Drishyam 3 trailer : विजय साळगावकर अडचणीत? ‘दृश्यम ३’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

Ajay Devgn Drishyam 3 : अजय देवगणसमोर जयदीप अहलावतचं नवं आव्हान, जुनं गुपित पुन्हा उघड होणार?

नवी दिल्ली : ‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवल्यानंतर आता तिसरा भागही चर्चेत आला आहे. ‘दृश्यम : द कन्क्लुजन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यावेळी विजय साळगावकरच्या आयुष्यात नवा पोलीस अधिकारी दाखल झाला आहे. जयदीप अहलावतने साकारलेली ही भूमिका विजयसमोर मोठं आव्हान उभे करते.

ट्रेलरमध्ये विजयने आतापर्यंत लपवून ठेवलेलं सत्य पुन्हा समोर येताना दिसतं. नव्या अधिकाऱ्याला या प्रकरणाचा तपास करून सत्य शोधायचं आहे. त्यामुळे विजयचा जुना प्लॅन यावेळी फसणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि प्रकाश राज हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. गोव्यात ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, जुन्या भागांप्रमाणेच यावेळीही गोवा कथेत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय पुन्हा एकदा पोलिसांना चकवणार की यावेळी त्याचं गुपित उघडणार? याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.