Ad Advertisement Ad Advertisement

प्रकाशकोड्यात वेगवान इंटरनेटचे गुपित – Barium Titanate

शास्त्रज्ञांनी तयार केली बेरियम टायटॅनेटची कुंडली : ऑप्टिकल संदेशवहन होऊ शकते सुपरफास्ट

सेऊल : Barium Titanate – प्रकाश मोठ्या प्रमाणात माहिती वाहून नेऊ शकतो. पण, वेगवान आणि अधिक कार्यक्षम ऑप्टिकल संदेशवहन प्रणाली विकसित करण्यासाठी तो कसा प्रवास करतो यावर काटेकोर नियंत्रणाची गरज असते. बेरियम टायटॅनेट (बीटीओ) हा एक असा पदार्थ आहे जो प्रकाशाद्वारे माहितीचे वहन करणाऱ्या भविष्यातील उपकरणांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतो. पण, गुंतागुंतीच्या रचनेमुळे आतापर्यंत त्याची ही क्षमता तपासता येत नव्हती.

संशोधकांनी आता बीटीओला समजून घेण्याच्या दिशेने मोठी आघाडी घेतल्याने ऑप्टिकल संदेशवहन प्रणालीत मोठ्या प्रगतीची चिन्हे आहेत.बीटीओमधून प्रकाश कशाप्रकारे प्रवास करतो आणि त्यापैकी किती शोषला जातो याची तपशिलवार माहिती कोरिया अ­ॅडव्हान्स्ड इन्स्टट्यिूट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी (केएआयएसटी) येथील संशोधकांच्या चमूने शोधून काढली आहे.स्फटिकाच्या गुंतागुंतीच्या अंतर्गत रचनेमुळे गेली अनेक दशके या गोष्टींची उकल शक्य झाली नव्हती.

ऑप्टिकल उपकरणे विकसित करण्यासाठी भक्कम पाया तयार

आता या नवीन शोधाने सिग्नल लॉसचे प्रमाण कमी करून माहितीचे वेगवान हस्तांतरण करणारी ऑप्टिकल उपकरणे विकसित करण्यासाठी अभियंत्यांना भक्कम पाया प्राप्त झाला आहे. केएआयएसटीने ८ नोव्हेंबर रोजी या शोधाचे निष्कर्ष जाहीर केले. केएआयएसटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्रो. मिन सिओक जांग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात कॅलिफोर्निया इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. हॅरी ए. अ­ॅटवॉटर यांचा चमू तसेच कोरिया रिसर्च इन्स्टट्यिूट ऑफ स्टँडर्ड्स अ­ॅण्ड सायन्स आणि अमेरिकेतील जे. ए. वुलम को यांचा सहभाग होता.

उपकरणे बनवण्यापूर्वीच अचूक मॉडेलिंग शक्य

बेरियम टायटॅनेट हे ऑप्टिकल संदेशवहनासाठी महत्त्वाचे साधन आहे, कारण विद्युतप्रवाह दिल्यावर त्याचा प्रकाशावरील परिणाम बदलतो (पॉकेल्स परिणाम). मात्र त्याचे अपवर्तनांक आणि शोषण गुणांक अचूक मोजणे अवघड होते, कारण स्फटिकातील वेगवेगळ्या दिशांचे ‘डोमेन’ मोजमापात मिसळतात. त्यामुळे दशकानुदशके परस्परविरोधी निकाल मिळत होते.

बीटीओ केएआयएसटी आणि कॅलटेकच्या संशोधकांनी मुलर मॅट्रिक्स स्पेक्ट्रोस्कोपिक एलिप्सोमेट्री वापरून, एकसारख्या डोमेन दिशा असलेल्या एकल-स्फटिक नमुन्यांचे १९० नॅनोमीटर ते ४० मायक्रोमीटर तरंगलांबीत मोजमाप केले. तेव्हा २ ते १० मायक्रोमीटर श्रेणीत प्रकाश शोषणाचे प्रमाण अत्यल्प आढळले. तसेच अनेक डोमेन असलेल्या स्फटिकाचा एकत्रित प्रकाशीय प्रतिसाद काढण्याची पद्धतही त्यांनी विकसित केली. यामुळे उपकरणे बनवण्यापूर्वीच प्रकाशमार्ग आणि सिग्नल लॉस यांचे अचूक मॉडेलिंग करता येईल; वेगवान डेटा प्रसारण आणि क्वांटम फोटॉनिक्ससाठी हे उपयुक्त ठरेल.

Read About : China Electric Aircraft : चीनच्या बॅटरीवर चालणाऱ्या 19 आसनी विमानाचे पहिले उड्डाण; 10 इलेक्ट्रिक फॅन्सची ताकद
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.