Ad Advertisement Ad Advertisement

Bihar Son River Tragedy : बिहारमध्ये सोन नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू; तिघे अल्पवयीन, वाचवायला गेलेल्या तरुणाचाही अंत

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील तीर्थ कोल गावाजवळील सोन नदीत दुर्घटना

आरा : Bihar Son River Tragedy बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात शनिवारी सोन नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुले आणि एका २५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. ही घटना संदेश पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीर्थ कोल गावात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही जण सोन नदीच्या घाटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. यादरम्यान तीन मुले खोल पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडू लागली. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौथा तरुणही नदीत बुडाला. आकाश कुमार (१५), प्रेम कुमार (१०), सिद्धांत कुमार (१६) आणि सुधीर कुमार (२५) अशी मृतांची नावे आहेत.

माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुले सोन नदीत आंघोळ करत असताना अचानक खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. तिघांना संकटात पाहून सुधीर कुमार त्यांना वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र, या प्रयत्नात तो स्वतःही पाण्यात बुडाला. पाहता पाहता चारही जण नदीत वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली. गावकऱ्यांनी स्वतःच्या पातळीवर बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रशासन आणि बचाव पथकाच्या मदतीने नदीत शोधमोहीम राबवण्यात आली. पोलीस अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सोन नदीतून चारही जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी आरा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Read About : UPI Charges Update – दिवाळीनंतर UPI शुल्क लागू होणार; 2,000 रुपयांवरील निवडक व्यापारी व्यवहारांवर परिणाम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.