Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Cotton Prices कमी दरामुळे कापूस उत्पादकांची ‘सीसीआय’कडे पाठ!

खासगी बाजारात समाधानकारक भाव

Marathwada Cotton Prices छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात अल्प पावसामुळे कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. कापूस उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज कृषी विभागातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दरम्यान खासगी बाजारात समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच ‘सीसीआय’ कडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

गेल्या महिनाभरापासून बाजारात कापूस विक्रीसाठी दाखल होत असून, सर्वसाधारणपणे ९००० ते ९५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. पैठण तालुक्यातील लोहगाव येथील मंगळवारच्या (दि. १३) आठवडी बाजारात कापसाला ९३०० रुपये भाव मिळाल्याचे कापूस उत्पादक ओंकार पठाडे, वसंत जगताप यांनी सांगितले. तर यंदा पावसाअभावी कापसाचे उत्पादन घटल्यामुळे कापसाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. आगामी काळात कापसाच्या भावात वाढ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने बोंडांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी असून, कापसाची प्रत उत्तम आहे. मात्र, एखाद-दुसऱ्या वेचणी झाली की केवळ पऱ्हाट्या उपाटण्याची दुर्दैवी वेळ यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. छत्रपती संभाजी नगरसह संपूर्ण मराठवाड्यातील हे विदारक चित्र आहे.

५ हजार गाठींची खरेदी

आतापर्यंत केवळ ५ हजार गाठींची खरेदी झाली आहे. खासगी बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांकडील नोंदणीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यंदा आवक मंदावली आहे. जागतिक बाजारातील तेजीचा मराठवाड्यातील खासगी बाजाराला मोठा आधार मिळत आहे. कापूस व्यापाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाच्या गाठींचे दर ६५ ते ६६ हजार रुपयांवरून थेट ६८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

या जागतिक दरवाढीचा थेट फायदा स्थानिक बाजाराला मिळत आहे. पावसाअभावी कापसात ओलावा कमी असल्याने यंदा मालाची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. मात्र, दर आणखी वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांती माल विक्रीसाठी आणलेला नाही. खासगी बाजारात भाव चांगला मिळत असल्याने सीसीआयकडील नोंदणीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यंदा आवक मंदावली असून, आतापर्यंत केवळ ५ हजार गाठींचीही खरेदी होऊ शकली आहे.

यंदा पावसाअभावी कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. यापुढे कापसाचे भाव आणखी वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस अद्याप बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांत आतापर्यंत केवळ ५ हजार गाठींचीच खरेदी झाली असून, आवक वाढल्यानंतरच जिनिंग उद्योगाला आणि एकूणच कापूस खरेदीला खरा वेग येण्याची अपेक्षा आहे.
-सारंगधर पाटील, पदाधिकारी, जिनिंग असोसिएशन

Read About: Rajkummar Rao Shahid – 13 वर्षांनंतर राजकुमार रावचा ‘शाहिद’ अखेर प्राइम व्हिडिओवर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.