Ad Advertisement Ad Advertisement

Optical AI Technology : विट्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली लाईट-पॉवर्ड ब्रेन प्रणाली

प्रकाशाच्या गुंतागुंतीच्या पॅटर्नमधील माहिती ओळखण्यासाठी ऑप्टिकल इंटेलिजन्सचा वापर; भविष्यातील क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डेटा ट्रान्सफरमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाची शक्यता

जोहान्सबर्ग : Optical AI Technology भविष्यातील दळणवळण आणि डेटा ट्रान्सफर क्षेत्रात दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध विट्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी क्वांटटम सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन प्रगत तंत्रज्ञानाचा मिलाफ करून एका लाईट-पॉवर्ड ब्रेन प्रणालीचा यशस्वी विकास केला आहे. ही प्रणाली प्रकाशाच्या क्लिष्ट पॅटर्नमधील लपलेली माहिती अचूकपणे वाचण्यास आणि ओळखण्यास सक्षम आहे.

असा झाला क्वांटम सायन्स आणि एआयचा मिलाफ

विट्स युनिव्हर्सिटीच्या स्ट्रक्चर्ड लाईट लॅबोरेटरीमधील संशोधकांनी भविष्यातील इंटरनेट आणि क्वांटम दळणवळणासाठी प्रकाशाच्या रचनेचा वापर करण्यावर संशोधन केले आहे. पारंपारिक पद्धतींमध्ये प्रकाशाच्या या गुंतागुंतीच्या लहरींमधील डेटा वाचणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काम होते. मात्र, शास्त्रज्ञांनी यामध्ये ऑप्टिकल इंटेलिजन्स म्हणजेच प्रकाशावर आधारित एआय टूल जोडले, ज्याने एका मानवी मेंदूप्रमाणे कार्य करत प्रकाशाच्या पॅटर्नमधून माहिती अचूकपणे डिकोड केली.

भविष्यातील इंटरनेट होणार हाय-स्पीड आणि सुरक्षित

या प्रणालीमुळे भविष्यातील संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. प्रकाशाच्या लहरींचा वापर केल्यामुळे डेटा ट्रान्सफरचा वेग अभूतपूर्व पातळीवर पोहोचेल, ज्यामुळे हाय-स्पीड इंटरनेटचा मार्ग मोकळा होईल. क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे हा डेटा ट्रान्सफर अत्यंत सुरक्षित असेल. यामध्ये डेटाची चोरी किंवा हॅकिंग करणे जवळपास अशक्य होईल.

मोहिमेचे पुढील पाऊल

दक्षिण आफ्रिकन क्वांटम टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्हचे संचालक प्राध्यापक अँर्ड्यू फोर्ब्स यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. शास्त्रज्ञांच्या मते, हा शोध केवळ दळणवळणापुरता मर्यादित नसून, याद्वारे प्रकाशाच्या वैयक्तिक कणांमधून माहिती मिळवणे शक्य होणार आहे. यामुळे आगामी काळात क्वांटम कॉम्प्युटिंग आणि प्रगत वैद्यकीय इमेजिंग क्षेत्राला देखील एक नवी दिशा मिळणार आहे.

Read About : NASA GPS-Free Navigation : अंतराळातील कचऱ्याच्या मदतीने नासाचे GPS शिवाय अचूक नेव्हिगेशन; अंतराळ संशोधनात मोठी झेप
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.