चीनला ४० टक्के लावणार, यादीतून ब्रिटनला वगळले
वॉशिंग्टन : US Tariff Proposal – अमेरिकेने आपल्या काही सर्वात मोठ्या व्यापार भागीदारांवर नवे आयात शुल्क (टॅरिफ) प्रस्तावित केले आहे. यात चीन, भारत आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे. वेगवेगळ्या देशांना आणि वस्तूंना वेगवेगळे दर लागू होतील.
चीनवर सर्वाधिक, म्हणजे ४० टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्यात येणार आहे. थायलंड आणि भारतासह काही देशांना २५ टक्क्यांपर्यंत तर जपान आणि इतर काही देशांना २० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्यात येणार आहे. ब्रिटनचा या यादीत समावेश नाही. सध्याचे टॅरिफ दर खूप वाटत असले तरी प्रत्यक्षात भरावे लागणारे दर यापेक्षा खूपच कमी असतील, असे सूत्रांनी म्हटले आहे. याचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांशी केलेले व्यापार करार. चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत या शुल्कामुळे अमेरिकेला वरचढ भूमिका मिळू शकते, असेही सांगण्यात आले.
यापूर्वी न्यायालयाने शुल्क ठरवले होते बेकायदा
दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी वारंवार शुल्काची धमकी दिली आहे किंवा ते लादले आहे. त्यामुळे अमेरिकी उत्पादन आणि रोजगार वाढतील, असे त्यांचे म्हणणे आहे. यंदा सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी आधी लादलेले शुल्क बेकायदेशीरपणे लागू केल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर आता हे नवे प्रस्ताव आले आहेत.
Read About : SEBI ने BSE 200 आणि Nifty CPSE यांचा महत्त्वपूर्ण निर्देशांकांतील दर्जा कायम ठेवला
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.