ओडिशा मध्ये व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
भुवनेश्वर : चालू खरीप हंगामात खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी ओडिशा सरकारने मोहीम सुरू केली आहे. राज्यभरात आतापर्यंत ११,६८४ खत दुकानांवर छापे टाकून व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कृषी मंत्रालयाचा कार्यभार असलेले उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव यांनी काळाबाजाराविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण आखले आहे.
यासाठी जिल्हा व ब्लॉक पातळीवर विशेष अंमलबजावणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. आयुक्त सचिन रामचंद्र जाधव यांच्या आदेशानुसार महसूल, कृषी आणि पोलीस विभागाची पथके नियमित तपासणी करत आहेत. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर खत नियंत्रण आदेश १९८५ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.