राजुरा: पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करीत वीजवाहिन्यांवरील ॲल्युमिनियम तार चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी बल्लारपूर येथील आरोपी रंजित ऊर्फ बल्ला निषाद (२६) व मुन्ना ऊर्फ लंगडा निषाद (३२) यांना अटक करण्यात आली आहे.
महावितरणचे कंत्राटदार संपावर असताना बंद विद्युत वाहिनीवरून १ लाख ९९ हजार ३०० रुपयांची तार चोरीला गेली होती. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
