आश्वासनानंतर आंदोलन मागे, तीन वर्षे पूर्ण होऊनही प्रमाणपत्र नाही, पगारवाढीच्या मागणीने कामगार आक्रमक
वाळूजमहानगर: वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाज ऑटो कंपनीच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा कामगारांचा आरोप आहे.
तसेच युवती व युवा कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये अनुभवी प्रमाणपत्र, अत्यल्प वेतन, पगारवाढ न करणे आणि तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर इतर ठिकाणी शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान बजाज ऑटो कंपनी व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, फाऊंडेशन व मनसेच्या पदाधिकारी-आंदोलकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चा अंती मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे पुढील तणावपूर्ण वातावरण निवळल्याने मोठा अनर्थ टळला.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.