Ad Advertisement Ad Advertisement

137 cancer drugs price reduction कर्करोगाची १३७ औषधे ७० टक्केस्वस्त होणार

९ नोव्हेंबरपासून नफ्यावर ३० टक्क्यांची मर्यादा लागू

137 cancer drugs price reduction नवी दिल्ली : औषधांच्या किमतींचे नियमन करणाऱ्या राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणा (एनपीपीए)ने शनिवारी १३७ कर्करोगविरोधी औषधांवरील ट्रेड मार्जिन (नफ्याचे प्रमाण) ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित केले आहे. ९ नोव्हेंबरपासून लागू होणार असलेल्या या निर्णयामुळे, या जीवनावश्यक औषधांच्या सध्याच्या किरकोळ स्तरावरील किमती ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, असे रसायन आणि खते मंत्रालयाने म्हटले आहे.

औषधे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘एनपीपीए’ने शनिवारी याबाबत राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार औषधे किंमत नियंत्रण आदेश, २०१३ च्या परिच्छेद १९ अंतर्गत ‘ट्रेड मार्जिन सुसूत्रीकरण’ प्रणाली लागू केली आहे. देशाच्या आरोग्यसेवा महासंचालनालयाने याबाबत एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. तिच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. समितीने १३७ औषधांच्या मार्जिनमध्ये सुसूत्रता आणण्याची शिफारस केली होती. ही यादी वेळोवेळी अद्ययावत केली जाईल.

एनपीपीएच्या २०१९ मधील प्रायोगिक टीएमआर उपक्रमांतर्गत ४२ कर्करोगविरोधी औषधांवरील व्यापार मार्जिन ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आले होते. त्यामुळे ५२६ ब्रँड्सच्या कमाल किरकोळ विक्री किमती (एमआरपी)मध्ये ९० टक्क्यांपर्यंत घट झाली होती. हे नवीन पाऊल त्याचाच पुढचा भाग आहे.

किमतींची यादी प्रसिद्ध करणे बंधनकार

औषध उत्पादकांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सुधारित किमतींची यादी प्रसिद्ध करणे आणि ती किरकोळ विक्रेते व रुग्णालयांपर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे.

पुढील महिन्यात अंमलबजावणी

याव्यतिरिक्त, किरकोळ विक्रेते आणि रुग्णालयांना ९ नोव्हेंबरपासून कमी केलेल्या दरांवरच औषधे विकावी लागतील आणि त्यांच्या फार्मसीमध्ये सुधारित किमती प्रदर्शित कराव्या लागतील.

रुग्णालयांवर जबाबदारी

कर्करोगविषयक औषधांचा मोठा हिस्सा थेट खरेदी करणाऱ्या रुग्णालयांना नवीन दर त्यांच्या वेबसाइटवर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. सुधारित किमतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची थेट जबाबदारीही त्यांचीच असेल. ग्राहक औषधांचे अद्ययावत दर एनपीपीएच्या वेबसाइटवर किंवा ‘फार्मा सही दाम’ या मोबाइल ॲपद्वारे तपासू शकतात.

Read About: Type 1 Diabetes Clinic – मधुमेहग्रस्त बालकांसाठी घाटीत राज्यातील पहिले विशेष क्लिनिक

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.