Ad Advertisement Ad Advertisement

Nanded Brown Sugar Bust : नांदेडमध्ये ब्राऊन शुगर विक्रीचा पर्दाफाश, 2 अटक

दोघांना अटक, ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nanded Brown Sugar Bust नांदेड : नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या गुरबिरसिंग हरपालसिंग संधू (वय ५०, मूळ रा. तरण तारण, पंजाब, ह.मु. श्रीनगर, नांदेड) आणि जनार्दन गोविंदराव सोनटक्के (वय ३०, रा. ब्राम्हणवाडा, नांदेड) या दोघांना नांदेड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून अंदाजे ३ लाख १० हजार रुपये किंमतीचा ६२ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिट्टा) मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान, रविवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नांदेड पोलिसांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर, विवेकनगर येथे किराणा दुकानाजवळ छापा टाकण्यात आला. फॉरेन्सिक पथकाने पदार्थाची तपासणी केल्यानंतर तो ब्राऊन शुगर असल्याची खात्री करण्यात आली.

चौकशीत आरोपींनी हा माल पंजाबमधील निक्का व बंटी यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली. या तपास मोहिमेत वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक तसेच फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी त्यांना पूर्ण सहकार्य पुरवले.

Read About: Dharashiv Hotel Owner Murder परप्रांतीय वेटरकडून हॉटेल मालकाचा खून 2026
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.