Happy Journey movie : ‘हॅपी जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित
हैदराबाद : Happy Journey trailer सात महिला…सात वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि सात वेगवेगळ्या आयुष्याच्या कथा, या सगळ्या महिला एका युरोप प्रवासासाठी एकत्र येतात आणि मग सुरू होतो नात्यांचा, भावनांचा आणि मैत्रीचा अनोखा प्रवास. ‘हॅपी जर्नी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रविवारी प्रदर्शित झाला असून, त्याची सध्या चर्चा सुरू आहे.
Happy Journey Telugu film : युरोपच्या प्रवासात बदलणार नाती
चित्रपटात अन्नपूर्णम्मा, आमानी, अँकर झांसी, पायल राधाकृष्ण, जिनिषा अलिसेट्टी, रूपा श्रीनिवास आणि सुनैना या सात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. पृथ्वी दंडामुडी, वंशी आणि रवी शिव तेजा हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेतट्रेलरमध्ये सात महिला एका पर्यटन मार्गदर्शकासोबत युरोपला जाताना दिसतात. सुरुवातीला प्रत्येकाची स्वत:ची समस्या आणि वेगळी विचारसरणी असते. त्यामुळे त्यांच्यात फारशी जवळीक नसते. पण प्रवास जसजसा पुढे जातो, तसतशा त्या एकमेकींना समजू लागतात. गप्पा, अनुभव, मतभेद आणि भावनिक प्रसंगांमधून त्यांच्यातील नातं घट्ट होत जातं. शेवटी या सातही महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनतात.
Happy Journey trailer seven women : चित्रपटात काय पाहायला मिळणार?
सुंदर युरोपीय ठिकाणे, मैत्री, भावना आणि आयुष्यातील वेगवेगळे अनुभव यांची सांगड या चित्रपटात घातली आहे. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांनी एकत्र प्रवास केला तर त्यांच्यात कोणते नवे नाते तयार होऊ शकते, हे चित्रपटातून दाखवले जाणार आहे.
Seven women European trip movi : दिग्दर्शनाची नवी सुरुवात
अभिराम नायडू या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. बालाजी गुट्टा आणि कौशिक रेड्डी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
एक प्रवास… सात महिला…आणि बदलणारी नाती ‘हॅपी जर्नी’चा प्रवास प्रेक्षकांना किती भावतो, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
Read About : Ganesh Chaturthi 2026:
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.