Ad Advertisement Ad Advertisement

Udta Teer trailer : ‘उडता तीर’चा ट्रेलर प्रदर्शित

आयुष्मान-साराची जोडी धुमाकूळ घालणार

मुंबई : Udta Teer trailer : आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांची नवी जोडी मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्या आगामी ‘उडता तीर’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून, यात कॉमेडी, ॲक्शन आणि भन्नाट गोंधळाचा फुल्ल डोस पाहायला मिळतोय. ट्रेलर पाहिल्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवणार, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ट्रेलरमध्ये हशा आणि धम्माल

‘उडता तीर’चा ट्रेलर मजेशीर प्रसंगांनी भरलेला आहे. वेगाने घडणाऱ्या घटना, गोंधळात अडकलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यातून निर्माण होणारा विनोद यामुळे ट्रेलरची रंगत वाढली आहे.आयुष्मान आणि सारा यांची केमिस्ट्रीही लक्ष वेधून घेते. दोघांच्या व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या अनेक मजेदार प्रसंगांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

कॉमेडीसोबत ॲक्शनही

हा सिनेमा फक्त कॉमेडी नाही. ट्रेलरमध्ये ॲक्शन आणि ॲडव्हेंचरचीही झलक दिसते. त्यामुळे हशासोबतच काही थरारक प्रसंगांचाही अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

मोठी स्टारकास्ट, मोठी धमाल

आयुष्मान आणि सारासोबत राहुल बोस, राम कपूर, सुहैलनय्यर, गुलशन ग्रोव्हर, रघुबीर यादव, बृजेंद्र काला, सुप्रिया पिळगावकर आणि स्मिता तांबे यांसारखे कलाकारही चित्रपटात आहेत. त्यामुळे ‘उडता तीर’मध्ये कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे.

आकाश ए. कौशिक यांचं दिग्दर्शकीय पदार्पण

आकाश ए. कौशिक ‘उडता तीर’मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या सिनेमाची निर्मिती करण जोहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी केली आहे.

९ ऑक्टोबरला थिएटरमध्ये

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे. ‘उडता तीर’ ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.कॉमेडी, ॲक्शन आणि गोंधळाचा तडका घेऊन आयुष्मान-सारा प्रेक्षकांना हसवायला येत आहेत.

Read About : Bigg Boss 20 Gullu divorce : ‘बिग बॉस २०’मध्ये गुल्लूचा धक्कादायक खुलासा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.