Ad Advertisement Ad Advertisement

Parliament Monsoon Session 88 Days- विक्रमी ८८ दिवसांपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

अधिवेशनाची अद्यापही अधिकृत समाप्ती नाहीच

नवी दिल्ली : Parliament Monsoon Session 88 Days गेल्या १३ ऑगस्ट रोजी संसदेची दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी स्थगित झाली. परंतु, तेव्हापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन विक्रमी ८८ दिवस उलटूनही अधिकृतरीत्या संपल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. याबरोबरच २००८ मधील ८७ दिवसांचा यापूर्वीचा विक्रम मोडीत निघाला आहे. केंद्र सरकार महिला आरक्षण विधेयक व परिसीमन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आणू शकते, असा कयास लावला जात आहे.

लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहाची सोमवारी सकाळपर्यंत औपचारिक समाप्ती झाली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाची विस्तारित बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तसेच महिला आरक्षण विधेयक अंमलबजावणी संबंधित प्रस्तावित घटनादुरुस्तीवर विचार करण्यासाठी अल्प कालावधीच्या नोटिसीवर संसदेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकते, या चर्चेला उधाण आले आहे. या विधेयकाद्वारे परिसीमन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेमार्फत लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून कमाल ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

एकाच अधिवेशनादरम्यान संसदेची विस्तारित किंवा विशेष बैठक बोलावण्यासाठी किमान दोन दिवसांची नोटीस पुरेशी असते. तर नवीन अधिवेशन बोलावण्यासाठी किमान १४ दिवसांच्या नोटीसची आवश्यकता असते. सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर किती कालावधीत अधिवेशन औपचारिकपणे समाप्त व्हावे? यासाठी राज्यघटनेत कोणतीही निश्चित वेळमर्यादा ठरवून दिलेली नाही. सभागृह दीर्घकाळ औपचारिकपणे समाप्त न होणे ही स्वत:हून कोणतीही घटनात्मक किंवा कायदेशीर अनियमितता ठरत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोणत्या वर्षी स्थगित…

संसदेच्या नोंदींनुसार, यापूर्वी २००८ मध्ये संसदेचे अधिवेशन ८७ दिवस, १९८७ मध्ये ७६ दिवस, १९८९ मध्ये ५४ दिवस, २००६ आणि २०१३ मध्ये प्रत्येकी ४९ दिवस आणि १९६३ मध्ये ४१ दिवस अनिश्चित काळासाठी स्थगित न होता तसेच राहिले होते.

दोन तृतियांश बहुमतासाठीच खटाटोप

संसदेचे पावसाळी अधिवेशन अधिकृतपणे संपल्याची घोषणा न करण्यामागे संसदेत कलंकित दोन तृतियांश बहुमताची जुळवाजुळव करण्याचा खटाटोप सुरू आहे, असा हल्ला काँग्रेसने चढवला. देशासाठी धोकादायक असे परिसीमन विधेयक मंजूर करण्याचा गृहमंत्री अमित शाह यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून अधिवेशन संपल्याची घोषणा केली नसल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Read About : PM Modi on ideological Naxalism- ‘दिमागी नक्षलवाद्यांचा’ धोका कायम-मोदी

E-Paper: Punyanagari E-Paperराष्ट्रीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.