Ad Advertisement Ad Advertisement

Mobile Phone Radiation : उशीखाली मोबाईल ठेवून झोपणे घातक

Mobile Phone Radiation : रेडिओ वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे वाईट परिणाम, किरणोत्सर्गामुळे ब्रेन ट्यूमरचा धोका

Mobile Phone Radiation नवी दिल्ली : जर तुम्हाला डोक्याजवळ उशीखाली मोबाईल फोन ठेवून झोपण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बदला. मोबाईल किरणोत्सर्गामुळे डोकेदुखी आणि सतत चक्कर येऊ शकतात. इतकेच नाही तर ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजाराचा धोका देखील असतो.
ब्रेन ट्यूमरची मुख्य कारणे म्हणजे वारंवार सीटी स्कॅन, रेडिओथेरपी, अनुवांशिक समस्या, किरणोत्सर्ग.

यामुळे मोबाईल किरणोत्सर्ग धोकादायक

मोबाईलचे नेटवर्क ही एक प्रकारची ऊर्जा आहे. जेव्हा फोन आपल्या डोक्याजवळ असतो तेव्हा ही ऊर्जा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम करते. ती आपल्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरते. त्यामुळे आपण मोबाईल दूर ठेवून झोपावे.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे
  • सतत डोकेदुखी, मळमळ.
  • प्रौढ किंवा वृद्धांमध्ये अचानक अपस्माराचा झटका.
  • शरीराच्या कोणत्याही भागाचे सुन्न होणे.
  • अचानक अडखळत चालणे.
  • बोलण्यात आणि ऐकण्यात समस्या.
डोक्यापासून दूर ठेवावे

डोक्याजवळ मोबाईल फोन ठेवून झोपल्याने उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ लहरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिणाम यामुळे ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. मोबाईल बेडपासून दूर ठेवावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Alzheimer Research : अल्झायमरवरील 99 टक्के औषधांच्या मानवी चाचण्या निष्फळ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.