उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील धक्कादायक घटना; एका पोळीवरून झालेल्या वादात वडिलांवर काठीने हल्ला केल्याचा आरोप, आरोपी मुलाला अटक
औरैया – Auraiya Murder Case उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नगरिया राजाराम गावात, एका मुलाने अवघ्या एका पोळीच्या वादावरून आपल्या ७५ वर्षीय वृद्ध वडिलांची काठीने मारहाण करून निर्घृण हत्या केली आहे. कंचन सिंह नायक असे मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
पोळीवरून पेटला मोठा वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. कंचन सिंह यांचा लहान मुलगा आझाद हा जेवायला बसला होता. त्यावेळी घरात घुसलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्याच्या जेवणाच्या थाळीतून एक पोळी पळवली. या क्षुल्लक गोष्टीमुळे आझाद प्रचंड संतापला आणि त्याने जवळच असलेल्या बाभळीच्या काठीने श्वानाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
वडिलांनी रोखले, मुलाने घेतला जीव
घरातील श्वानाला बेदम मारताना पाहून वडील कंचन सिंह यांनी आझादला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर ते रागावले. तसेच श्वानाने पोळी नेल्यावरून त्याला टोमणाही मारला. वडिलांनी श्वानाला वाचवल्यामुळे आणि सर्वांसमोर बोलल्यामुळे आझादचा राग अनावर झाला. त्याने श्वानाला सोडून हातात असलेल्या त्याच जड काठीने थेट आपल्या वृद्ध वडिलांच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले.
उपचाराअभावी जागीच मृत्यू
काठीचा गंभीर मार लागल्यामुळे कंचन सिंह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. घटना घडल्यानंतर आझाद तिथून पळून गेला होता. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे वृद्ध कंचन सिंह यांचा मृत्यू झाला. घरात उपस्थित असलेल्या त्यांच्या नातीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा सविस्तर तपास करत पोलिसांनी फरार आरोपी आझादला बेड्या ठोकल्या आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Read About : Nagaur ATM Theft Attempt : महिला बँक व्यवस्थापकाचे प्रसंगावधान; 16 लाखांची रोकड वाचली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.