Ad Advertisement Ad Advertisement

Fungal disease resistance in rice, wheat and sorghum – भात, गहू अन् ज्वारीचे पीक बुरशीपासून सुरक्षित राहणार

वैज्ञानिकांनी शोधला नवा मार्ग : पीकांची अंगभूत प्रतिकारक्षमता वाढणार

लंडन : Fungal disease resistance in rice, wheat, and sorghum -घातक बुरशीपासून अन्नपिकांचा बचाव करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवी पद्धत शोधून काढली आहे. पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवून भवष्यिात भात, गहू आणि ज्वारी या पिकांना बुरशीजन्य आजारांविरुद्ध अधिक मजबूत करणे आता शक्य होणार आहे.


ब्रिटनमधील जॉन इनेस सेंटरच्या वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून, जपानच्या कोबे वद्यिापीठातील संशोधकांनीही यात मोलाचे योगदान दिले आहे. हा संशोधन अहवाल सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या जागतिक दर्जाच्या नियतकालिकात प्रसद्धि झाला आहे.मॅग्नापोर्टे ओरिझाई ही अतिशय उपद्रवी बुरशी या संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. हीच बुरशी भातावर पडणाऱ्या भयानक ब्लास्ट (तांबेरा/करपासदृश) रोगाला कारणीभूत ठरते. दरवर्षी या रोगामुळे जगभरात ६ कोटी लोकांचे वर्षभराचे पोट भरू शकते इतका भात वाया जातो. चिंतेची बाब म्हणजे ही बुरशी आता आशिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये गहू आणि ज्वारीच्या पिकांनाही लक्ष्य करू लागली आहे. ती वनस्पतींच्या पानांमध्ये आणि खोडामध्ये काही घातक रसायने सोडते, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि रोग झपाट्याने पसरतो. मानवाप्रमाणेच वनस्पतींमध्येही रोगांचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक क्षमता असते. पिकांमधील विशष्टि प्रथिने बुरशीचे आक्रमण ओळखून पिकाचे रक्षण करतात. आत्तापर्यंत शास्त्रज्ञ मुख्यत्वे एनएलआर नावाच्या प्रतिकारक प्रथिनांवर अभ्यास करत होते. मात्र, या संशोधनात त्यांनी गवताळ पिकांमध्ये आढळणाऱ्या टीकेपी (टँडम कायनेज प्रथिने) या प्रथिनांवर लक्ष केंद्रित केले.

वैज्ञानिकांनी नक्की काय केले?

वैज्ञानिकांनी टीकेपी प्रथिनांमधील एचएमए या विशष्टि भागाचा सखोल अभ्यास केला. हा भाग बुरशीने सोडलेल्या घातक रसायनांना तत्काळ पकडतो, ज्यामुळे झाडाला संकटाची पूर्वकल्पना मिळते आणि पिकाची सुरक्षा यंत्रणा सतर्क होते. संशोधकांनी एचएमए च्या रचनेत असा बदल केला, ज्यामुळे ते एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींचे आक्रमण ओळखू शकेल. निसर्गात एकाच प्रथिनाने अनेक रोगजंतूंना ओळखणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते, म्हणूनच हे संशोधन मैलाचा दगड ठरत आहे. सध्या हे प्रयोग गव्हाच्या पेशींवर यशस्वीरीत्या करण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात नियंत्रित हवामान असलेल्या हरितगृहात (ग्रीनहाऊस) पूर्ण झाडांवर याची चाचणी घेतली जाईल. एनएलआर आणि टीकेपी या दोन्ही प्रतिकारक प्रथिनांचा एकत्र वापर केल्यास पिकांचे कवच अधिक अभेद्य होईल आणि बुरशीला पिकाची सुरक्षा भिंत भेदणे कठीण जाईल, असा वश्विास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

भारतासाठी हे का महत्त्वाचे आहे?

भारतामध्ये भात आणि गहू ही मुख्य अन्नपिके आहेत. त्यामुळे ह्यब्लास्टह्णसारख्या विनाशकारी रोगाला ठामपणे तोंड देणारे नवे वाण विकसित झाल्यास देशाची अन्नसुरक्षा मजबूत होईल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळेल. जरी हे तंत्रज्ञान सध्या प्रायोगिक टप्प्यावर असले, तरी भवष्यिात शेतातील प्रत्यक्ष वातावरणात हे प्रयोग कितपत प्रभावी ठरतात, याकडे आता संपूर्ण कृषी जगताचे लक्ष लागले आहे.

Read about : France Farmer Relief Package : फ्रान्स सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 1 अब्ज युरोचे पॅकेज

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.