Ad Advertisement Ad Advertisement

Ayushman Card application : आयुष्मान कार्ड बनवताना ही घ्या काळजी – 2026

तुम्हीही घरी बसल्या तपासू शकता पात्रता

Ayushman Card application Update : आयुष्मान कार्ड बनवताना तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागेल नाही तर तुमची छोटीशी चुक तुमचा त्रास वाढवू शकते. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे कार्ड बनवताना फोटो स्पष्ट असावा, यामुळे लाभार्थींची ओळख पटू शकेल.

देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास आणि गरजवंत नागरिकांनासाठी प्रत्येक वर्षांला ५ लाख रूपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा दिला जातो. जेणे करून गरीब व्यक्तीलाही चांगले उपचार उपलब्ध व्हावे. यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे. या योजनाअंतर्गत पात्र व्यक्तींना आयुष्मान कार्ड बनवता येते. याद्वारे सरकारी आणि खासगी रूग्णालयात कॅशलेश (मोफत) उपचार मिळतात. जर तुम्हालाही आयुष्मान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. जेणे करून तुमचा अर्ज नाकाराला जावू नये आणि लवकरात लवकर तुमचे आयुष्मान कार्ड बनवून दिले जाईल.

कार्ड बनवताना ही घ्या काळजी

१. फोटो संदर्भातील महत्त्वाच्या बाबी

  • जेव्हा तुम्ही आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी अर्ज करता आणि लाइव फोटो घेता, त्यावेळी तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे की फोटो स्पष्ट दिसणारा असावा.
  • ब्लर फोटो असल्यास तुमचा अर्ज नाकाराला जावू शकतो.
  • जर अर्जदाराने मोबाइलमधील फोटोचा फोटो काढला असेल किंवा फोटोचा फोटो काढून जमा केला असेल तर अर्ज (रिजेक्ट) नाकारला जावू शकतो.
  • त्यामुळे अर्ज करताना केवळ लाइव्ह फोटोच काढा, जेणे करून तुमचा अर्ज स्विकारला जाईल.

२. आवश्यक कागदपत्रे

  • आयुष्मान कार्ड बनवताना सर्व कागदपत्रे तुमच्या जवळ तयार ठेवा.
  • आधार कार्डपासून ते रेशन कार्डपर्यंत.
  • ई-केवाईसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
माहिती जुळणे आवश्यक

अर्जावर नाव आणि तुमच्याकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रावरील नावाची स्पेलिंग एक सारखी असणे आवश्यक आहे.
वडिलांचे नाव, जन्म तारीख आणि पत्ता ही माहिती योग्य असणे गरजेचे आहे.
जर तुम्ही अर्जावर दिलेली माहिती आणि कागदपत्रावर असलेली माहिती जुळली नाही तर तुमचा अर्ज नाकारला जावू शकतो.

अशी तपासा ऑनलाईन पात्रता

सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनामध्ये सर्व लाभार्थी ऑनलाईन अर्ज करून आयुष्मान कार्ड बनवत आहेत. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत पात्रतेसंदर्भात माहिती हवी असेल तर आयुष्मान ॲप डाउनलोड करून पात्रता तपासता येते. ऑनलाईन कार्ड बनवण्यासाठी अर्जही करता येतो. अर्ज किंवा पात्रता तपासण्यासाठी नेहमी सरकारच्या अधिकृत Ayushman App किंवा PM-JAY Portal चा वापर करा.

Read About : Paracetamol Liver Damage : पॅरासिटामॉल जेवढे चांगले तेवढेच वाईट
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.