Ad Advertisement Ad Advertisement

Triple Murder 2026 : देहरादूनमध्ये भरदिवसा तिहेरी हत्याकांड; वृद्ध दांपत्यासह मोलकरणीची हत्या

विष्णूलोक कॉलनीत लुटीच्या प्रयत्नातून हल्ला; रक्ताने माखलेला पेचकस घेऊन पळणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

देहरादून : Triple Murder उत्तराखंडची राजधानी देहरादून येथील रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या विष्णूलोक कॉलनीत भरदिवसा एक अत्यंत अंगावर काटा आणणारे तिहेरी हत्याकांड घडले आहे. घरफोडी आणि लुटीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या एका माथेफिरूने वृद्ध दांपत्य आणि त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेची भोसकून निर्घृण हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून निवृत्त झालेले ८५ वर्षीय रमेश कपूर, त्यांची ७६ वर्षीय पत्नी रजनी कपूर आणि त्यांची ४५ वर्षीय मोलकरीण शीला यांचा समावेश आहे. दुपारी आरोपी चोरीच्या उद्देशाने कपूर यांच्या घरात घुसला. त्याने रजनी कपूर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध करताच आरोपीने त्यांच्यावर पेचकसने सपासप वार केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून बचावासाठी धावलेली मोलकरीण शीला आणि त्यानंतर वृद्ध रमेश कपूर यांच्यावरही आरोपीने पेचकसने प्राणघातक हल्ला चढवला.

घरातून किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे नागरिक तातडीने घराकडे धावून आले. लोकांना पाहून आरोपी हातात रक्ताने माखलेला पेचकस दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नागरिकांनी धैर्याने त्याला जागीच पकडले. संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर रायपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

गंभीर जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी १० मिनिटे रुग्णवाहिकेची वाट पाहिली गेली, परंतु ती न आल्याने शेजाऱ्यांनी स्वतःच्या वाहनांतून त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

Read About : Engineer Robbed in CSN – तुझ्याकडे ड्रग्स आहे म्हणत चाकूच्या धाकावर अभियंत्याला लुटले!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.