Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar child abuse case विकृत बापाने पाचवीतील लेकीचे कपडे फाडून दिले सिगारेटचे चटके! 24 वर्षीय मोठ्या भावानेच तक्रार दिली

काही दिवसांपूर्वी वृद्ध आईलाही केली होती मारहाण, मध्यरात्री अंगावर थंड पाणी ओतून कापले केस

Chhatrapati Sambhajinagar child abuse case छत्रपती संभाजीनगर : पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसारवाडी येथे उघडकीस आली. मनासारखे वागली नाही म्हणून एका निर्दयी आणि विकृत बापाने स्वत:च्या दहा वर्षांच्या मुलीचे मध्यरात्री कपडे फाडून तिच्या अंगावर थंड पाणी ओतले. तो एवढ्यावरच थांबला नाही.

त्याने तिच्या कोवळ्या हात-पायांवर सिगारेटचे चटके देत डोक्याचे केस कापले. याप्रकरणी २४ वर्षीय मोठ्या भावानेच तक्रार दिली असून, पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची हर्सूलला रवानगी केली आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्याने स्वत:च्या वृद्ध आईलाही मारहाण केली होती.

पीडित चिमुकली पाचवीत शिकते. तिच्या आईचे कोरोना काळातच निधन झालेले आहे. ती दोन भाऊ, वहिनी आणि वडिलांसोबत राहते. आरोपी बाप अत्यंत क्रूर स्वभावाचा असून, मनासारखे न वागल्यास तो मुलांना नेहमीच अमानुष मारहाण करतो. रविवारी (दि. २५) मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याने मुलीचे कपडे जबरदस्तीने काढले. थंडी वाजत असतानाही त्याने तिच्या अंगावर गार पाणी ओतले आणि हात-पायांना जळत्या सिगारेटने चटके दिले. त्यानंतर मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने डोक्याचे पाठीमागील केस कापून तिचा विनयभंग केला.

भावासमोर चिमुकलीने फोडला हंबरडा

बापाच्या छळानंतर घाबरलेली चिमुकली सकाळी एका नातेवाईकाच्या घरी निघून गेली. बहीण घरात नसल्याने मोठ्या भावाने शोध सुरु केला. तेव्हा ती जटवाडा रोड भागातील नातेवाईकाकडे असल्याचे समजले. तिथे भाऊ पोहोचताच चिमुकलीने त्याच्यासमोर हंबरडा फोडत रात्रीचा अमानुष प्रकार सांगितला. बहिणीची अवस्था पाहून संतापलेल्या भावाने थेट सिडको पोलिसांत धाव घेत बापाविरुद्ध पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक सोपान नराळे अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

लाख रुपयांचे आमिष दाखवून नातेवाइकाकडूनच विनयभंग

उस्मानपुरा ठाण्यात दाखल दुसऱ्या एका घटनेत, ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा नातेवाईकानेच विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास उस्मानपुरा भागात घडला. कोणाला सांगू नको, तुला एक-दोन लाख रुपये देईन, असे आमिष दाखवत आरोपीने मुलीला बळजबरीने घरात नेले आणि पलंगावर बसवून जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत त्याला जोरदार धक्का देऊन सुटका करून घेतली. आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली असून, आईच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांत पोक्सो नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Read About : Lawrence Bishnoi gang and Indian underworld : अंडरवर्ल्डला वेळीच संपवायला हवं
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.