Ad Advertisement Ad Advertisement

Fake Woman Police Officer in Sambhajinagar खाकी वर्दीचा शौक अंगलट; तोतया महिला पोलीस जाळ्यात!

खऱ्या पोलिसांसोबत फोटो काढण्याचा मोह नडला : नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याची मारली थाप

Fake Woman Police Officer in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : पालकांच्या हट्टापायी ती पोलीस भरती अकॅडमीत दाखल झाली खरी, पण तच्यिाकडून मैदानी चाचणी काही पूर्ण होत नव्हती. शेवटी अकॅडमीत काही दिवस काढल्यानंतर, तिने चक्क नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्याची बतावणी करत तोतया पोलीस होण्याचा मार्ग पत्करला. धक्कादायक म्हणजे, सर्व नातेवाईकांना पोलीस झाल्याचे सांगत तिने स्वत:ची खाकी वर्दीही शिवून घेतली. हीच वर्दी घालून ती थेट कर्णपुरा यात्रेत फिरत होती.

मात्र, तिथे खऱ्या महिला पोलिसांसोबत फोटो काढण्याचा मोह तिला नडला आणि तिचा ढल्लिा बेल्ट पाहून पोलिसांना संशय आला. या चौकशीत ती तोतया पोलीस असल्याचे नष्पिन्न झाले असून, छावणी पोलिसांनी तिला ताब्यात घेत ११ ऑक्टोबर रोजी तच्यिावर गुन्हा दाखल केला आहे. आम्रपाली रमेश नरवाडे (२१, रा. जवखेडा, ता. कन्नड) असे या तोतया महिला पोलीस तरुणीचे नाव आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. या प्रकरणी अंमलदार मिना जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

नवरात्रोत्सवानिमत्ति कर्णपुरा येथे श्री तुळजाभवानी देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी (दि. ११) दुपारी छावणी ठाण्याच्या डीबी पथकाचे अंमलदार अरुण उगले, ठाकूर, सोरमारे, सुमेध पवार, कावेरी सुरासे, सलमा शेख आणि मिना जाधव हे कर्णपुरा भागात गस्तीवर होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कर्णपुऱ्यातील मारुती मंदिराजवळ त्यांना एक तरुणी पोलीस गणवेशात दिसली. पोलीस पथकाला पाहताच ती स्वत:हून त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे आली.

तिची वर्दी पाहून सुरुवातीला महिला पोलीसही फोटो काढायला तयार झाल्या. पण, तिची उंची आणि तच्यिा कमरेचा ढल्लिा बेल्ट पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी लागलीच तिची सखोल विचारपूस सुरू केली अन् तिचे बिंग फुटले.

म्हणे, ३० जणांची टीम आली!

पोलिसांनी विचारपूस केली असता, तिने जानेवारी २०२६ मध्ये नाशिक ग्रामीणला भरती झाल्याचे आणि तीन महन्यिांपासून प्रशक्षिण सुरू असल्याचे सांगितले. तसेच, प्रशक्षिण केंद्रातून ३० नवप्रवष्टि पोलिसांची टीम कर्णपुरा बंदोबस्तासाठी आली आहे, अशी थापही तिने मारली. मात्र, कर्णपुरा येथे बाहेरच्या जल्ह्यिातून कोणताही बंदोबस्त मागवलेला नाही. येथे फक्त सातारा एसआरपीएफची एक कंपनी आहे, हे पोलिसांना माहीत असल्याने ती खोटे बोलत असल्याची खात्री झाली. त्यानंतर तिला लागलीच ताब्यात घेण्यात आले.

मध्यरात्रीपर्यंत पालक ठाण्यात आलेच नाहीत

आम्रपालीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला छावणी ठाण्यात नेले. तच्यिाकडून नंबर घेऊन तिचे वडील आणि भावाला फोन करून पोलीस ठाण्यात बोलावले. ते ‘येतो, येतो’ म्हणत होते, मात्र मध्यरात्रीपर्यंत कोणीही छावणी ठाण्यात फिरकले नाही. अखेर, तिच्या मावशीच्या एका नातेवाईकाला बोलावून तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार वंदना गवळी करीत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.

Read About : MSP Procurement 2026-27 – केंद्र सरकारकडून हमीभावाने डाळी, तेलबिया खरेदीला मंजुरी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.