Ad Advertisement Ad Advertisement

Rahul Vaidya Disha Parmar viral video – राहुल वैद्यच्या वक्तव्याने खळबळ, दिशा परमार म्हणाली, ‘गप्प राहा’

‘पती पत्नी और पंगा २’मधील व्हिडीओ व्हायरल, राहुलवर नेटकऱ्यांची टीका

मुंबई |: Rahul Vaidya Disha Parmar viral video – गायक राहुल वैद्यने असं काय म्हटलं की, पत्नी दिशा परमारने त्याला थेट गप्प राहण्यास सांगितलं? ‘पती पत्नी और पंगा २’ या रिॲलिटी शोमधील एका प्रसंगामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कार्यक्रमात राहुलचे एक वक्तव्य टीव्हीवर ‘बीप’ (म्यूट) करण्यात आले. त्यानंतर दिशा परमार, अर्चना पूरण सिंह आणि इतर सहकलाकारांच्या प्रतिक्रिया पाहून प्रेक्षकही अवाक झाले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुलवर नेटकऱ्यांकडून टीका होत आहे.

राहुलच्या उत्तराने सगळेच चकित

‘पती पत्नी और पंगा २’ या कार्यक्रमात प्रसिद्ध जोडप्यांसाठी वेगवेगळे मजेशीर खेळ घेतले जातात. सोनाली बेंद्रे आणि मुनव्वर फारुकी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.
एका भागात राहुल वैद्य, विवेक दहिया आणि परमीत सेठी यांना त्यांच्या पत्नीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. लग्नापूर्वी पत्नी करत असलेल्या, पण लग्नानंतर आता करत नसलेल्या पाच गोष्टी सांगण्याचे आव्हान त्यांना देण्यात आले होते.
या फेरीत दिशा परमारने सर्वांत आधी बजर दाबल्यामुळे राहुलला उत्तर देणे भाग होते. मात्र, राहुलने दिलेले उत्तर वाहिनीने ‘बीप’ केले. त्यामुळे त्याने नेमके काय म्हटले, हे प्रेक्षकांना ऐकू आले नाही. मात्र, त्याच्या या वक्तव्यावर उपस्थित कलाकारांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले.
दिशा म्हणाली, ‘काही बोलूच नकोस’
राहुलचे बोलणे ऐकल्यानंतर दिशा परमारने त्याला तिथेच थांबवले. ती म्हणाली, ”काही बोलूच नकोस. तू काहीतरी चुकीचेच बोलशील. आता गप्प राहा.”
हे ऐकून सेटवर उपस्थित असलेली अर्चना पूरण सिंह कमालीची आश्चर्यचकित झाली. तर अभिनेत्री दीपिका सिंहने, ‘हे टीव्हीवर बोलण्यासारखे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे कार्यक्रमातील हा प्रसंग अधिकच चर्चेत आला.

अर्जुन बिजलानीची टिप्पणी

अभिनेता अर्जुन बिजलानीनेही राहुलच्या या वक्तव्यावर फिरकी घेतली. त्यावर पलटवार करताना राहुलने, ‘लोकांना इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप रस असतो,’ असे म्हटले. यावर अर्जुनची पत्नी नेहा स्वामी हिनेही प्रतिक्रिया दिली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा संपूर्ण प्रसंग सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी राहुलच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नॅशनल टीव्हीवर पत्नीबद्दल बोलताना शब्दांचा वापर जपून करायला हवा, असे मत अनेकांनी मांडले आहे.
दुसरीकडे, राहुलने नेमके काय म्हटले होते, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच या वादावर राहुल किंवा दिशा या दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर हे जोडपे काही स्पष्टीकरण देणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Read About: Sonali Bendre cancer journey – माझंच शरीर मला वेदना देत होतं तरी त्याच्यावर प्रेम करायला शिकले – सोनाली बेंद्रे

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.