Ad Advertisement Ad Advertisement

Barreleye Fish : पारदर्शक डोक्याचा दुर्मीळ Barreleye Fish पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद! हिरवे डोळे पाहून शास्त्रज्ञही थक्क

मॉन्टेरी बे मत्स्यालय संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पॅसिफिक महासागरात सुमारे १,९७० फूट खोलीवर या दुर्मीळ माशाचे २० मिनिटे चित्रीकरण

न्यूयॉर्क : Barreleye Fish समुद्राच्या अथांग खोलीत अनेक आश्चर्यकारक जीव आढळतात. त्यापैकीच पारदर्शक डोके आणि हिरवे डोळे असलेला दुर्मीळ ‘बॅरेलआय’ मासा प्रथमच त्याच्या नैसर्गिक अधिवासात उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमेरिकेतील मॉन्टेरी बे मत्स्यालय संशोधन संस्थेच्या संशोधकांनी पॅसिफिक महासागरात ही महत्त्वपूर्ण नोंद केली.

मॉन्टेरी दरीपासून सुमारे ५५ मैल अंतरावर समुद्रात संशोधन मोहीम सुरू होती. ‘डेव्हिड पॅकाड’ या जहाजावरून संशोधक ‘डॉक रिकेट्स’ या दूरनियंत्रित यंत्राच्या मदतीने खोल समुद्रातील जीवांचा अभ्यास करत होते. याच वेळी त्यांना हा मासा दिसला. समुद्रसपाटीपासून सुमारे १,९७० फूट खोलीवर त्याचे तब्बल २० मिनिटे चित्रीकरण करण्यात आले. Barreleye Fish

पारदर्शक डोक्यातून दिसतात हिरवे डोळे

वैज्ञानिक नाव मॅक्रोपिना मायक्रोस्टोमा असलेला हा मासा साधारण सहा इंच लांबीचा असतो. तो समुद्राच्या संधिप्रकाश आणि अंधाऱ्या पट्ट्यात, साधारण २,००० ते २,६०० फूट खोलीवर राहतो. त्याच्या डोक्यावरील पारदर्शक आवरणातून हिरवे डोळे स्पष्ट दिसतात. Barreleye Fish

दुर्मीळ दर्शन

संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ स्टीव्हन हॅडॉक यांनी हा विलक्षण जीव असल्याचे सांगितले. मासेमारीच्या जाळ्यांत सापडलेल्या नमुन्यांमध्ये पारदर्शक आवरण नष्ट झाल्यामुळे जुन्या चित्रांमधून त्याचे खरे स्वरूप ओळखणे कठीण होते. जिवंत अवस्थेत हे आवरण पाहण्याची संधी विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधकांच्या ४० वर्षांच्या समुद्र संशोधनात हा मासा यापूर्वी केवळ दहा वेळा आढळला होता.

Read About: Lycurgus Cup Roman Glass : प्रकाशानुसार हिरवीची लाल होते काच, 1,600 वर्षांपूर्वीच्या रोमन काचेचे रहस्य उलगडले!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.