Ad Advertisement Ad Advertisement

Lycurgus Cup Roman Glass : प्रकाशानुसार हिरवीची लाल होते काच, 1,600 वर्षांपूर्वीच्या रोमन काचेचे रहस्य उलगडले!

शेफिल्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी सोन्या-चांदीच्या अतिसूक्ष्म नॅनो कणांचा वापर करून तयार केली रंग बदलणारी काच; प्राचीन रोमन कारागिरांच्या कौशल्याचे आधुनिक प्रयोगातून दर्शन

लंडन : Lycurgus Cup Roman Glass प्रकाशाच्या दिशेनुसार रंग बदलणाऱ्या १,६०० वर्षांपूर्वीच्या रोमन काचेचे रहस्य अखेर शास्त्रज्ञांनी उलगडले आहे. ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी प्राचीन रोमन तंत्राचा आधार घेत प्रसिद्ध ‘लायकर्गस कप’सारखा रंग बदलणारी काच तयार केली आहे. सामान्य प्रकाशात हिरवा दिसणारा हा कप मागून प्रकाश टाकल्यावर लालसर रंगाचा होतो. काचेच्या निर्मितीतील ही अद्भुत कलाकुसर शतकानुशतके संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय होती. Lycurgus Cup Roman Glass

ब्रिटिश वस्तूसंग्रहालयामध्ये असलेल्या मूळ कपाचा संबंध चौथ्या शतकातील रोमन काळाशी आहे. त्यावर ग्रीक पुराणकथेतील राजा लायकर्गस आणि मद्यनिर्मितीचा देव डायोनिसस यांचे शिल्प कोरलेले आहे. २०२२ मध्ये त्याचा जगातील सात काचेच्या आश्चर्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. शेफिल्ड विद्यापीठातील डॉ. लिसा हॉलंड्स आणि प्रा. कॅरोलिन जॅक्सन यांनी या प्रयोगासाठी सोन्या-चांदीचे अतिसूक्ष्म नॅनो कण काचेमध्ये मिसळले. वाळूच्या कणापेक्षा हजारपट लहान असलेले हे कण काच १,००० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर वितळवून थंड करताना त्यात साचले. Lycurgus Cup Roman Glass

प्रकाशामुळे कसा बदलतो रंग?

या नॅनो कणांमुळे प्रकाशातील निळा आणि हिरवा रंग शोषला जातो. त्यामुळे काचेमधून प्रकाश आरपार गेल्यास लाल आणि नारिंगी रंग दिसतात. मात्र, पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित झाल्यास हिरवट रंग दिसतो. त्यामुळे एकाच काचेचे दोन वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. Lycurgus Cup Roman Glass

रोमन कारागिरांच्या कौशल्याला सलाम

पुरातत्त्वीय साहित्याचे तज्ज्ञ प्रा. इयान फ्रीस्टोन यांच्या मते, यापूर्वीही अशा काचेची निर्मिती झाली होती; मात्र शेफिल्डमधील प्रयोगात मूळ कपाच्या हिरव्या आणि लाल रंगांशी अधिक जवळीक साधली आहे. भट्टीतील तापमान आणि काचेचे स्थान यावर रंग अवलंबून असल्याने रोमन कारागिरांसाठी ही प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असावी. या संशोधनातून प्रेरित आधुनिक शिल्प ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान शेफिल्डच्या मिलेनियम गॅलरीत प्रदर्शित होणार असून, त्यानंतर टर्नर म्युझियम ऑफ ग्लासमध्ये कायमस्वरूपी ठेवले जाणार आहे.

Read About : Mercury to Gold Conversion – प्राचीन भारतीय रसायनविद्येच्या मदतीने पाऱ्याचे सोन्यात रूपांतर?, MNIT करणार पडताळणी
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.