Ad Advertisement Ad Advertisement

Pm Surya Ghar Yojana – छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 71 हजार घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प

२५२ मेगावॅट वीजनिर्मिती! वीजग्राहक बनले वीजनिर्माते, वीजबिलाचा भार होणार कमी!

छत्रपती संभाजीनगर : Pm Surya Ghar Yojana – प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल ७१ हजार ८७२ घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता २५२.२२ मेगावॅट इतकी आहे. त्यामुळे घरगुती वीजग्राहक आता केवळ वीज वापरणारे न राहता स्वत: वीज निर्माण करणारे बनत आहेत.


वाढती विजेची गरज आणि दरमहा येणाऱ्या वीजबिलाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी नागरिक सौरऊर्जेकडे वळत आहेत. घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती करता येत असल्याने स्वतंत्र जागेची आवश्यकता भासत नाही. पूर्वी घरांच्या छतांचा वापर प्रामुख्याने पाण्याच्या टाक्या किंवा अडगळीतले साहित्य ठेवण्यासाइी होत असे. आता याच छतांवर सौर पॅनेल उभारून वीजनिर्मिती केली जात आहे. यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता नसल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पात्र घरगुती ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी कमाल ७८ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. तसेच विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. छतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मिळविण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. घरगुती वापरानंतर वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून त्याची रक्कम ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जाते.

तीन मंडलांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील तीन मंडलांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात ३६ हजार ४०७ ग्राहकांनी १२९.३८ मेगावॅट, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात २१ हजार ७९९ ग्राहकांनी ७५.२२ मेगावॅट, तर जालना मंडलात १३ हजार ६६६ ग्राहकांनी ४७.६१ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच उभारले आहेत.
ग्रामीण भागात या योजनेला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या ग्रामपंचायतींनाही प्रोत्साहन निधी देण्याची तरतूद आहे. गृहनिर्माण संस्था आणि गृहसंकुलांनाही सामायिक वीज वापर तसेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी अनुदान उपलब्ध आहे.

२५ वर्षे मोफत विजेचा लाभ

३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ही योजना विशेष उपयुक्त आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमधून सुमारे २५ वर्षे घरगुती वापरासाठी जवळपास मोफत वीज उपलब्ध होण्याची संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा.
दीपक कुमठेकर (मुख्य अभियंता)

Read About : Potters Free Clay Royalty – पिढीजात कुंभारांना वर्षाला 700 ब्रास माती मोफत रॉयल्टीवर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.