Ad Advertisement Ad Advertisement

Homo Erectus Rainforest – होमो इरेक्टस घनदाट वर्षावनातही राहत होते

चीनमधील नव्या शोधाने बदलला जुना समज

बीजिंग : Homo Erectus Rainforest – आपले दूरचे पूर्वज होमो इरेक्टस हे मोकळ्या मैदानात आणि गवताळ प्रदेशातच राहत होते, असा समज आतापर्यंत होता. चीनमधील नव्या शोधाने तो बदलला आहे. ग्वांग्शी प्रांतातील बॅक्सियन आणि नॅक्सियन गुहांतील जिवाश्म दातांनी होमो इरेक्टस वर्षावनातही राहू शकत होते हे पहल्यिांदाच दाखवले.

या दोन गुहांत मिळून एकूण नऊ मानवी दात सापडले. त्यापैकी आठ होमो इरेक्टसचे असल्याचे स्पष्ट झाले, तर नववा दात डेनिसोव्हन मानवाचा असू शकतो आणि त्याचा अभ्यास सुरू आहे. आठ पैकी सहा दात नॅक्सियन गुहेतील आणि दोन बॅक्सियनमधील आहेत. ते सुमारे ३,२४,००० ते १,८४,००० वर्षांपूर्वीचे आहेत. या गुहा एकमेकांपासून सुमारे १५ किलोमीटरवर आहेत.

गाळात मानवी जीवाश्मासह १९,००० हून अधिक प्राण्यांचे जीवाश्मही होते

दात सापडलेल्या गाळात १९,००० हून अधिक प्राण्यांचे जीवाश्मही होते. दातांतील रासायनिक खुणांवरून दिसते की मानव आणि प्राणी दोघेही मोकळ्या प्रदेशावर नव्हे, तर घनदाट उष्णकटिबंधीय जंगलावर अवलंबून होते. हे निष्कर्ष बुधवारी नेचर नियतकालिकातील दोन शोधनिबंधांत प्रसद्धि झाले.

कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची कला

होमो इरेक्टस ही आफ्रिकेबाहेर स्थलांतर करणारी माणसाच्या वंशातील पहिली प्रजाती मानली जाते. ती कुठेही जुळवून घेऊ शकत होती, असे आता दिसते. म्हणजे आपले पूर्वज केवळ मैदानात नव्हे, तर जंगलातही जगण्याची कला शिकले होते. आपल्या पूर्वजांचा प्रवास आपण समजतो त्यापेक्षा खूप गुंतागुंतीचा आणि लांबचा होता, हेच या दातांतून पुन्हा दिसते.

Read About : Marathwada Wildlife Sanctuaries – मराठवाड्यातील 4 वन्यजीव अभयारण्यांचे ढिसाळ व्यवस्थापन चव्हाट्यावर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.