Ad Advertisement Ad Advertisement

Siddharth Swimming Pool Lifetime Membership – 45 हजार रुपये भरा;सिद्धार्थ जलतरण तलावाचे आजीव सभासदस्यत्व मिळवा

सवलत केवळ पाच दिवसासाठी;वीस वर्षे राहता येते सभासद : गतवर्षीच्या तुलनेत ११ हजार रुपयांची सवलत

छत्रपती संभाजीनगर : Siddharth Swimming Pool Lifetime Membership: महानगरपालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावाचे आजीव सभासदस्यत्व (२० वर्षांसाठी) घेण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये ११ हजार रुपयांची घसघशीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी ५६,१५५ रुपये भरावे लागत होते, तर या सवलतीमुळे आता ४५,१५५ रुपये भरून आजीव सदस्यत्व होता येणार आहे. महापालिका प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजूरी दिल्यानंतर ही सवलत लागू करण्यात आली आहे. ही सवलत २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या पाच दिवसांसाठीच लागू राहणार आहे.

महापालिकेच्या स्थयी समितीने १ एप्रिल २०२५ पासून सिद्धार्थ जलतरण तलावाच्या आजीव सभासदस्यत्व होण्यासाठी ५१,१५५ रुपये नोंदणी शुल्क ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच पुढील प्रत्येक आर्थिक वर्षात या शुल्कामध्ये १० टक्के वाढ करण्यासही मान्यता दिलेली आहे. त्यानुसार २०२६-२७ या वर्षासाठी वाढीव १० टक्के वाढ करून ५६,१५५ रुपये शुल्क १ एप्रिल २०२६ पासून आकारण्यात येत आहे. हे शुल्क कमी करावे, अशी मागणी सिद्धार्थ जलतरण तलावाच्या मासिक, त्रैमासिक, व वार्षिक सभासद घेतलेल्या नागरिकांनी केली. याबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदनही दिले. दरम्यान महापौर समीर राजूरकर यांनी मे महिन्यात सिद्धार्थ जलतरण तलावाला भेट दिली होती.

यावेळी सभासदांनी आजीव सभासदस्यत्व शुल्क कमी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर महापौर राजूरकर यांनी शुल्क कमी करण्याबाबत आयुक्त अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली., व ४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या सर्वसाधारण सभेसमोर आयुक्तांनी प्रशासनाच्या वतीने शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. आयुक्त येडगे यांनी ११ हजार रुपयांची सवलत केवळ पाच दिवसांसाठीच देण्यात येईल, असे प्रस्तावात नमूद केले होते. त्यानुसार २३ ते २७ नोव्हेंबर या पाच दिवसांमध्येच ४५,१५५ रुपये भरून आजीव सभासदस्यत्व होता येणार आहे.

सवलत केवळ पाच दिवसांसाठीच

सिद्धार्थ जलतरण तलावाचे आजीव सभासदस्यत्व होण्यासाठी नागरिक व जलतरणप्रेमींना केवळ पाच दिवसांसाठी ही विशेष सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घ्यावा. दिलेल्या मुदतीनंतर ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही, याची नोंद घ्यावी., असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महिलांना मासिक, त्रैमासिक शुल्कात २० टक्के सवलत

तलावावर पोहण्यासाठी १८७० रुपये मासिक शुल्क आकारले जाते. यात १२ वर्षाखालील मुलांसाठी केवळ ११०० रुपये शुल्क आकारण्यात येते, त्रैमासिक शुल्कापोटी ४४०० रुपये तर मुलांसाठी २७५० रुपये शुल्क आहे. विशेष म्हणजे महिलांना या शुल्कात २० टक्के सूट देण्यात येते.

राज्यातील सर्वाधिक महसूल देणारा तलाव

सिद्धार्थ जलतरण तलावाचे आजपर्यंत ६५० सदस्य आहेत, यात ४०४ सदस्यांनी आजीव सभासद आहेत. उन्हाळ्यात जलतरणप्रेमींची संख्या १४०० पर्यंत जाते. आजीव सभासद होण्यासाठी सवलत जाहीर केल्याने ही संख्या आणखी वाढेल. पुणे, मुंबई, ठाणे यासह राज्यातील महापालिकांच्या जलतरण तलावाच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जलतरण तलाव हा सर्वाधिक महसूल देणारा आहे. सन २०२६ मध्ये ७५ लाख ९० हजार ६६८ रुपये महसूल मनपाला मिळाला आहे. : अभय देशमुख, व्यवस्थापक, सिद्धार्थ जलतरण तलाव.

Read About : Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.