Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Taekwondo Association Seeks Government Support 2026 – तायक्वांदोच्या विकासासाठी राज्य सरकारकडे असोसिएशनचे साकडे

खेळाडूंच्या सुविधांसाठी ३६ जिल्ह्यांत आधुनिक प्रशिक्षण केंद्रे, स्वतंत्र एक्सलन्स सेंटरची मागणी

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Taekwondo Association Seeks Government Support – महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाचा सर्वांगीण विकास करण्यासह खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रपवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

महाराष्ट्रात सध्या १० लाखांहून अधिक खेळाडू नियमितपणे तायक्वांदोचा सराव करतात. राज्यातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक क्रीडा सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन मिळावे, यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

तायक्वांदो खेळाचा ग्रामीण तसेच शहरी भागात विस्तार करून नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, राज्यातील एका प्रमुख शहरात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त स्वतंत्र ‘एक्सलन्स सेंटर’ (उत्कृष्टता केंद्र) मंजूर करावी. या केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, सरावासाठी आवश्यक साधनसामग्री आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून द्यावे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेमध्ये तायक्वांदो खेळाचा समावेश करावो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आधुनिक क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षण सुविधांनी युक्त तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रे सुरू करावे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे तयारीत अडथळे येऊ नयेत, यासाठी त्यांना १०० टक्के आगाऊ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे. खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी स्पोर्ट्स सायन्सच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी. याशिवाय महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये नियमित तायक्वांदो प्रशिक्षण सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव अमजदखान (गफ्फार) पठाण, कोषाध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष तुषार आवटे, रोहन बांगर, दत्ता कदम, सुमित खंडागळे, सुरेश जाधव, प्रणव निवंगुणे, ज्योती पगारे, डेव्हिड, यश बोभाटे उपस्थित होते.

Read About : Ugc List 32 Fake Universities – विद्यार्थ्यांनो, प्रवेश घेण्यापूर्वी सावधान!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.