Ad Advertisement Ad Advertisement

कुटुंबाची काळजी घेण्याला पुरुषांकडून महिलांपेक्षा अधिक महत्त्व – Men’s Family Responsibilities

अमेरिकेतील ३७५ प्रौढांवर केलेल्या अभ्यासात पुरुषांनी कुटुंबाची काळजी घेणे हे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग मानल्याचे दिसून आले

नवी दिल्ली : Men’s Family Responsibilities घर सांभाळणे आणि मुलांची काळजी घेणे ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पुरुषांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मानणारे पुरुष महिलांपेक्षा किंचित अधिक असल्याचे एका मानसशास्त्रीय अभ्यासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक स्त्री-पुरुष भूमिकांबाबत अनेक मुद्द्यांवर दोन्ही गटांचे विचार जवळपास समान असल्याचे संशोधकांना आढळले.

‘सेक्स रोल्स’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात अमेरिकेतील ३७५ प्रौढ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. संशोधकांनी तयार केलेल्या प्रश्नावलीत बालसंगोपन, घरातील कामे, आर्थिक उत्पन्न मिळवणे आणि करिअरची जबाबदारी या चार बाबींविषयी सहभागींची मते जाणून घेण्यात आली.

बहुतांश मुद्द्यांवर पुरुष आणि महिलांच्या मतांमध्ये फारसा फरक नव्हता. मात्र, पुरुषांनी कुटुंबाची काळजी घेणे आणि घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे किती महत्त्वाचे आहे, या प्रश्नावर वेगळे चित्र दिसले.

पुरुषांनी दिले अधिक महत्त्व?

कुटुंबाची काळजी घेणे हे पुरुषांच्या व्यक्तित्त्वाचा महत्त्वाचा भाग आहे, या विधानाला पुरुषांनी सातपैकी सरासरी ५.४२ गुण दिले. महिलांचे सरासरी गुण ४.९९ होते. म्हणजेच, पुरुषांनी स्वत:च्या कौटुंबिक भूमिकेला तुलनेने अधिक महत्त्व दिले.
पारंपरिक विचारसरणी असणाऱ्यांमध्ये पुरुषांनी कमावते असावे आणि महिलांनी घराची अधिक जबाबदारी घ्यावी, अशी धारणा अधिक असल्याचेही संशोधनात दिसले. राजकीयदृष्ट्या पुराणमतवादी विचारांच्या सहभागींचाही कल अशाच अपेक्षांकडे होता.

घर आणि करिअर यांचा समतोल शक्य

कुटुंबाची जबाबदारी पुरुषांनी स्वीकारल्याने महिलांच्या करिअरच्या संधी मिळतील, असे संशोधकांचे मत आहे. घर आणि व्यावसायिक आयुष्य या परस्परविरोधी जबाबदाऱ्या नसून दोघांनीही त्यात सहभाग घेणे शक्य आहे. मात्र, हा अभ्यास अमेरिकेपुरता आणि मर्यादित नमुन्यावर आधारित आहे. त्यामुळे हे निष्कर्ष भारतासह इतर देशांनाही लागू होतात, असे म्हणण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे.

Read About : Senior Citizen Care in India : संध्याछाया भिवविती हृदया…
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.