Ad Advertisement Ad Advertisement

Ancient bird with dinosaur-like teeth – उडता न येणारा पक्षी 15 कोटी वर्षांपूर्वीही होता?

दात डायनासोरसारखे, पायाला धारदार नख

चीन : Ancient bird with dinosaur-like teeth – आजच्या पक्ष्याना चोच असते, पंख असतात आणि अनेक पक्षी आकाशात उंच भरारी घेतात. पण कल्पना करा, १५ कोटी वर्षांपूर्वी एक असा पक्षी होता, ज्याच्या तोंडात डायनासोरसारखे दात होते आणि पायाला धारदार, वाकडे नख होते. एवढेच नव्हे, तर त्याला उडताही येत नसावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. चीनमध्ये सापडलेल्या या प्राचीन पक्ष्याच्या जीवाश्मामुळे पक्ष्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास अधिक रंजक झाला आहे.

कावळ्याएवढ्या पक्षाचं अनोखे वैशिष्ट्ये

या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव युएझुओर्निस यांगयुआनेन्सिस असे आहे. त्याचा आकार साधारण कावळ्याएवढा होता. चीनमधील फुजियान प्रांतात सापडलेल्या जीवाश्माच्या अभ्यासातून संशोधकांना त्याची माहिती मिळाली. या पक्ष्याच्या तोंडातील दात विशेष लक्षवेधी होते. त्यांच्या कडा करवतीसारख्या होत्या. त्यामुळे ते काही मांसाहारी डायनासोरच्या दातांसारखे दिसत होते. त्याच्या पायाच्या एका बोटाला वाकडे आणि धारदार नख होते. ही वैशिष्ट्ये त्याला आजच्या पक्ष्यांपेक्षा वेगळे ठरवतात.

पंख होते, पण उडता येत नव्हते?

जीवाश्मातील हाडे आणि पायांची रचना तपासल्यानंतर संशोधकांनी हा पक्षी जमिनीवर वावरत असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याला उडता येत नसावे, अशीही शक्यता मांडण्यात आली आहे. मात्र, तो उडू शकत नव्हता, हे अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेले नाही.
संशोधकांच्या मते, हा शोध पक्ष्यांच्या उत्क्रांतीतील उडण्याची क्षमता कशी बदलत गेली, हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

डायनासोर आणि पक्ष्यांच्या इतिहासाचा नवा धागा

पक्षी आणि डायनासोर यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी अशा जीवाश्मांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वीच्या या पक्ष्याची शरीररचना त्या काळातील जीवसृष्टी किती वैविध्यपूर्ण होती, याची कल्पना देते. आज आकाशात झेपावणाऱ्या पक्ष्यांच्या पूर्वजांच्या जगात दात आणि धारदार नख असलेले असे जीवही होते. निसर्गाच्या इतिहासात अजून किती आश्चर्य दडली आहेत, याचा विचार करायलाही हा शोध भाग पाडतो.

Read About: WASP-17b Atmosphere : जेम्स वेब टेलिस्कोपने उलगडले परग्रहाच्या वातावरणाचे त्रिमितीय रहस्य

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.