मोजणी सुरू झाल्यापासूनचा तिसरा सर्वांत कमी विस्तार
लंडन : Antarctic sea ice extent – दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका खंडात दरवर्षी सप्टेंबर महन्यिात प्रचंड थंडीमुळे समुद्राचे पाणी गोठून बर्फाचा सर्वात मोठा थर तयार होतो. यंदाच्या सप्टेंबरमध्येही हा हिवाळी बर्फ तयार झाला, पण त्याचे प्रमाण मात्र नेहमीपेक्षा खूपच कमी राहिले. १९७८ मध्ये उपग्रहाद्वारे मोजणी सुरू झाल्यापासूनच्या इतिहासात, यावर्षी जमा झालेला बर्फ आजवरचा ह्यतिसरा सर्वात कमीह्ण बर्फ ठरला आहे.
जिथे आधी मैलोन्मैल पांढरीशुभ्र चादर पसरलेली दिसायची, तिथे आता उघडा-बोडका नीळा समुद्र दिसू लागला आहे. अंटार्क्टिकाच्या बर्फाळ जगात चिंताजनक बदल घडून येत असल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. उत्तर ध्रुवासारखी रचना इथे नाही. उत्तर ध्रुवावर समुद्राभोवती जमीन आहे, तर अंटार्क्टिकाभोवती पसरलेला विशाल महासागर आहे. त्यामुळे हिवाळा सुरू झाल्यावर इथल्या बर्फाला समुद्रावर दूरवर पसरण्यासाठी भरपूर मोकळी जागा मिळते. पण हीच रचना बर्फासाठी घातक ठरते. पसरत चाललेला हा बर्फ हळूहळू उबदार पाण्याच्या भागात ढकलला जातो. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच तो वेगाने वितळू लागतो. म्हणूनच सप्टेंबरमध्ये अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्यातील बर्फ सर्वात जास्त प्रमाणात साचतो तर फेब्रुवारीमध्ये उष्णतेमुळे आकुंचन पावून तो सर्वात कमी पातळीवर येतो.
२०२६ च्या मोजणीत काय समोर आले?
नासा आणि नॅशनल स्नो अँड आइस डेटा सेंटरच्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी या बर्फाने या वर्षातील आपली सर्वोच्च पातळी गाठली होती. सुमारे १ कोटी ७५ लाख ९० हजार चौरस किलोमीटर (६७.९ लाख चौरस मैल) एवढा बर्फाचा विस्तार झाला होता. तथापि, उपग्रहीय नोंदींनुसार हिवाळ्यातील बर्फाचा हा तिसरा सर्वात कमी वस्तिार आहे. ज्या समुद्राच्या भागात कमीत कमी १५ टक्के बर्फ असतो, त्याच भागाला ‘बर्फाच्छादित क्षेत्र’ मानले जाते. आकाशात कितीही दाट ढग असले, तरी त्या ढगांमधून पार पाहू शकणाऱ्या उपग्रहांवरील मायक्रोवेव्ह सेन्सर्सच्या मदतीने ही अचूक मोजणी केली जाते.
आधी वाढणारा बर्फ अचानक कसा घटला?
१९७९ ते २०१४ या काळात दर १० वर्षांनी अंटार्क्टिकातील बर्फ १ टक्क्याने वाढत होता. २०१२ ते २०१४ दरम्यान तर बर्फ वाढण्याचे सलग तीन नवे वक्रिम झाले होते. २०१५ नंतर अचानक ही वाढ थांबली आणि २०१६ पासून बर्फ वेगाने कमी होऊ लागला. २०२३ हे वर्ष उपग्रह नोंदीतील आजवरचे सर्वात वाईट वर्ष ठरले. त्यावर्षी उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंत इतिहासातील सर्वात कमी बर्फ नोंदवला गेला होता. आता २०२६ मध्येही बर्फाचे प्रमाण असेच घटल्यामुळे अंटार्क्टिकातील ही घसरण कायमस्वरूपी आहे की निसर्गातील तात्पुरता बदल, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.
Read About : Greenland Glacier Melting – जहाजांना अशक्य ठरलेल्या समुद्रात नार्व्हल माशांनी उलगडले हिमनग वितळण्याचे रहस्य
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.