Ad Advertisement Ad Advertisement

Cancer Medicine Price Cut : कॅन्सरवरील 1,364 औषधांचे नवे दर आजपासून झाले लागू

रुग्णांची दरवर्षी ३,५४० कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज

नवी दिल्ली : Cancer Medicine Price Cut कॅन्सरवरील १,३६४ औषधांच्या (अँटी-कॅन्सर फॉर्म्युलेशन) सुधारित आणि कमी झालेल्या किमती सोमवार आजपासून लागू झाल्या आहेत. यामुळे कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असून, रुग्णांना दरवर्षी अंदाजे ३,५४०.३८ कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे.

रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरणाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे, १३७ अँटी-कॅन्सर औषधांच्या छापील किमतीवरील ट्रेड मार्जिन मर्यादित करण्यात आले आहे. हा निर्णय १७ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात आला होता.

८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, एकूण ८५ औषध कंपन्यांनी १२१ वेगवेगळ्या औषधांचा समावेश असलेल्या १,३६४ अँटी-कॅन्सर फॉर्म्युलेशनच्या सुधारित आणि कमी झालेल्या किमतींची माहिती जाहीर केली आहे.

या निर्णयाचे फायदे

  • ५०% पेक्षा जास्त कपात : एकूण औषधांपैकी ६७९ ब्रँड्सच्या किमतींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे.
  • ९६.४५% पर्यंत सूट: औषधांच्या किमतींमध्ये सर्वात मोठी कपात ९६.४५ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. म्हणजेच काही औषधे आता पूर्वीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत.
  • वार्षिक बचत: किमतींमधील या मोठ्या कपातीमुळे ग्राहकांची वार्षिक सुमारे ३,५४०.३८ कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा आहे.
एनपीपीए चे ग्राहकांना आवाहन

प्राधिकरणाने ग्राहकांना आवाहन केले आहे की, औषध खरेदी करताना पॅकेटवर छापलेली नवीन सुधारित एमआरपी नक्की तपासून पाहावी. औषधांच्या नव्या किमतींची खात्री तुम्ही फार्मा सही दाम मोबाईल ॲप किंवा एनपीपीए च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकता.

Read About : Ghati Hospital Bronchoscopy Almond Removed Child – दिवाळी पहाट ठरली चिमुकल्यासाठी जीवनदानाची!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.