Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Muhurat Trading 2026 – तब्बल 8 वर्षांनंतर दिवाळीच्या दिवशीच्या तेजीला ब्रेक, पण गुंतवणूकदारांची चांदी!

मुहूर्ताच्या सौद्यात नफारूपी विक्रीने शेअरबाजरात किंचित घसरण; बीएसई आणि एनएसईवर रंगले खास सोहळे

मुंबई : Diwali Muhurat Trading 2026 संवत २०८३ ची सुरुवात करणाऱ्या यंदाच्या विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्रात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवत ८ वर्षांची सलग विजयाची मालिका मोडली. गेल्या सात दिवसांपासून बाजारात सुरू असलेल्या जोरदार तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली पसंत केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह बंद झाले.

यंदाच्या या दिवाळी पाडव्यानिमित्त देशातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये उत्साहाचे वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. बॉबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये पारंपरिक सोहळ्यात बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांनी खास ‘मुहूर्त बेल’ वाजवून या विशेष सत्राची सुरुवात केली. तर दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों, पद्मिनी कोल्हापुरे आणि शेबा यांनी एकत्रित येऊन ‘मुहूर्त बेल’ वाजवण्याचा मान मिळवला, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही प्रमुख बाजारांमधील या दिमाखदार आणि स्वतंत्र सोहळ्यांनी यंदाच्या मुहूर्ताच्या रंगात आणखी भर घातली.

सत्राची सुरुवात जोरदार झाली असली, तरी सेन्सेक्स २८.६२ अंकांनी घसरून ८०,९९९.४० वर स्थिरावला. सत्रादरम्यान सेन्सेक्सने ८१,४४२.११ ची उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे, एनएसई निफ्टी ४३.९५ अंकांनी घसरून २४,९८६.४० वर बंद झाला. २०१८ पासून सलग आठ वर्षे दिवाळीच्या दिवशी बाजारात तेजी नोंदवली गेली होती, ज्याला यंदा ब्रेक लागला.

बाजार घसरला, तरी गुंतवणूकदारांचे लाखो कोटी वाढले!

विशेष म्हणजे, निर्देशांकात किंचित घसरण झाली असली, तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल २.६० लाख कोटी रुपयांची भर पडली असून एकूण बाजार भांडवल ५,०५,६७,७४३.४० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कोणी मारली बाजी, कोण घसरले?

तोटा सहन करणारे : महिंद्रा अँड महिंद्रा, इंडिगो, ट्रेंट, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि ॲक्सिस बँक.
नफ्यात राहिलेले : सन फार्मा, टाटा स्टील, मारुती आणि पॉवर ग्रिड.

तज्ज्ञ काय म्हणतात?

मोतीलाल ओसवालचे सह-संस्थापक रामदेव अग्रवाल यांच्या मते, गेल्या दोन वर्षांच्या सुस्तीनंतर पुढील दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळण्याची क्षमता बाजारात आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील संभाव्य घसरण, स्थिर परकीय गुंतवणूक आणि कंपन्यांची वाढती कमाई यामुळे बाजाराला बळ मिळेल. थोडक्यात सांगायचे, तर संवत २०८३ चा पहिला दिवस घसरणीच्या संपला असला, तरी पुढील वर्षासाठी बाजाराचा पाया भक्कम असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मुहूर्त ट्रेडिंगची रंजक वैशिष्ट्ये
  • संवत २०८३ च्या स्वागतासाठी यंदा दुपारी २:२० ते ३:३० या एका तासाच्या विशेष सत्रात व्यवहार झाले.
  • ऐतिहासिक पाहिल्यास मुहूर्त सत्रातील तेजी सामान्यत: १ टक्क्याच्या आतच असते; परंतु मागील ८ वर्षे ती सातत्यपूर्ण राहिली होती.
  • २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत मुहूर्त सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले होते.
  • २०१८ ते २०२५ या सलग ८ वर्षांत मात्र बाजाराने नेहमी सकारात्मक बंद होऊन नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
  • यंदा मात्र या ८ वर्षांच्या सलग विजयांच्या मालिकेला अचानक ब्रेक लागला.

Read About : Muhurat Trading 2026- दिवाळीनिमित्त शेअर बाजारात विशेष मुहूर्त ट्रेडिंग!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.