सर्वेक्षण करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे आदेश; चार तालुक्यांचे काम पूर्ण, माणगाव, म्हसळा आणि रोहा या तालुक्यांच्याही समावेशाची मागणी
मुंबई : Drought in Maharashtra 2026 राज्यातील यापूर्वी जाहीर केलेल्या ३०४ दुष्काळी तालुक्यांव्यतिरिक्त आणखी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. यापैकी गडहिंग्लज, हातकणंगले, दिंडोरी आणि वाडा या चार तालुक्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, मावळ, चिपळूण, कर्जत, पेण, तळा, महाड, विक्रमगड, मुळशी आणि शहापूर या उर्वरित नऊ तालुक्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन निर्णय घेतला जाणार आहे.
पूर्ण झालेल्या सर्वेक्षणानुसार दिंडोरीतील ३२ गावांमध्ये ११ हजार ३५० पैकी ३ हजार ३३३.७९ हेक्टर क्षेत्रावर, हातकणंगलेमध्ये १२ गावांतील ३ हजार ६५५ हेक्टरवर, गडहिंग्लजमध्ये ४० गावांतील १ हजार ४९८ हेक्टरवर आणि वाडा तालुक्यात ३४ गावांमधील ५५३.६१ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान नोंदवण्यात आले आहे. याशिवाय रायगडमधील माणगाव, म्हसळा आणि रोहा या तालुक्यांचाही यादीत समावेश करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, धरणे आणि नद्यांमधील गाळ काढण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे यंत्रसामग्री कमी पडल्यास जलसंपदा विभागाची यंत्रसामग्री वापरण्याची मुभा द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
४ हजार ७०१.६ कोटी रुपयांची अग्रीम मदत
राज्यातील ९४.३ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हजार ७०१.६ कोटी रुपयांची अग्रीम मदत वितरित करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला सर्वाधिक १ हजार ७०४.५ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, कोकण विभागातील ४ लाख ८ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ७७ हजार शेतकऱ्यांनाच अद्याप ही मदत मिळू शकली आहे.
Read About : Maharashtra dam water levels 2026 – धरणांतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांची घट
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.