Advertisement Advertisement

Kareena Kapoor Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर करीना कपूरची हजेरी

Kareena Kapoor new film : नव्या सिनेमाच्या चर्चेला उधाण, ‘दायरा’ प्रदर्शनाच्या वाटेवर

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री Kareena Kapoor खान ही जुहू येथील दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali यांच्या ऑफिसबाहेर दिसल्याने चित्रपटसृष्टीत नव्या चर्चेला उधाण आले आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये, कपाळावर बिंदी आणि केसांचा अंबाडा बांधलेल्या अत्यंत साध्या आणि सुरेख लूकमध्ये करीना भन्साळींच्या ऑफिसमध्ये जाताना स्पॉट झाली. या भेटीमुळे दोघे लवकरच एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे.

२००२ मधील ‘देवदास’ चित्रपटात ‘पारो’च्या भूमिकेसाठी करीनाने ऑडिशन दिली होती; परंतु ती भूमिका ऐश्वर्या राय बच्चनला मिळाली. तेव्हापासून या दोघांमध्ये व्यावसायिक वाद असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे करीनाने भन्साळींसोबत काम केल्यास, हा त्यांचा एकत्र पहिलाच चित्रपट ठरेल.संजय लीला भन्साळींचा ‘लव्ह ॲण्ड वॉर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट सध्या पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

करीना कपूर लवकरच ‘दायरा’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. ‘दायरा’ चित्रपटात करीना आणि पृथ्वीराज हे दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत एका बाल गुन्ह्याचा तपास करताना दिसतील. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.