दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीपंपाच्या वीजबिलात सवलत; टँकर, चारा आणि रोजगार हमीच्या कामांनाही गती
मुंबई – Maharashtra Drought गेल्या काही दिवसांपासून चिंतातूर असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नर्णिय घेतला आहे. राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ सदृश परस्थितिी जाहीर करण्यात आली असून, या संदर्भातील शासन नर्णिय आज जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ३८७ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्राचा सुमारे ७५ टक्के भाग आता दुष्काळाच्या छायेत आला आहे.
विविध भागांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या पीकहानीमुळे शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न मिळण्याची शक्यता नसल्याने सरकारने हा नर्णिय घेतला. या दुष्काळी परस्थितिीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ विशेष सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत.
विभागनिहाय तालुका संख्या
| विभाग | जिल्हानिहाय तालुके | एकूण तालुके |
|---|---|---|
| छत्रपती संभाजीनगर विभाग | छ. संभाजीनगर – ९, जालना – ८, बीड – ११, लातूर – १०, धाराशिव – ८, नांदेड – १४, परभणी – ९, हिंगोली – ५ | ७४ |
| अमरावती विभाग | बुलढाणा – १३, अमरावती – १४, अकोला – ७, वाशिम – ६, यवतमाळ – १६ | ५६ |
| नाशिक विभाग | नाशिक – १०, धुळे – ४, जळगाव – १५, नंदुरबार – ६, अहिल्यानगर – १४ | ४९ |
| नागपूर विभाग | वर्धा – ७, नागपूर – १४, भंडारा – ३, गोंदिया – १, चंद्रपूर – १२, गडचिरोली – २ | ३९ |
| पुणे विभाग | पुणे – ८, सोलापूर – ११, सांगली – ४, सातारा – ६, कोल्हापूर – ६ | २९ |
| कोकण विभाग | रायगड – १, रत्नागिरी – ३, सिंधुदुर्ग – ८ | १२ |
| एकूण | — | २५९ |
टीप: ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत निरंक परिस्थिती आहे.
दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार?
- जमीन महसुलात सूट
- पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट
(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट) - शालेय/महावद्यिालयीन वद्यिार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
- आवश्यक त्या ठिकाणी पण्यिाचे टँकर्स
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही
- शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
- जनावरांच्या चार्याची व्यवस्था करणार
- जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
- पण्यिाचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
- पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जल्हिाधिकार्यांना आदेश
- पिकांची स्थिती दाखवणारे छायाचत्रि, जीपीएस संकलित करण्याचे आदेश
Read About : Mushtaq Khan Death – ‘वेलकम’च्या बल्लूने घेतला अखेरचा निरोप
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.