Ad Advertisement Ad Advertisement

Nakshatrawadi Daytime House Burglary – नक्षत्रवाडीत दिवसा फोडली 2 घरे; साडेतीन तोळे दागिने लंपास

एका ठिकाणी अवघ्या तासाभरात मारला डल्ला : लॅच लॉक नसलेले, कमी फ्लॅटचे अपार्टमेंट टार्गेट

छत्रपती संभाजीनगर : Nakshatrawadi Daytime House Burglary – रात्रीच्या अंधारात होणाऱ्या घरफोड्या आता भरदिवसा सुरू झाल्या असून, चोरांनी नक्षत्रवाडी परिसरात एकाच भागातील दोन वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून सुमारे साडेतीन तोळ्यांचा ऐवज लंपास केला आहे. कमी फ्लॅट असलेले अपार्टमेंट आणि लॅच लॉक नसलेली घरे हेरून रेकी करून डाव साधण्याचा नवा पॅटर्न शहरात डोके वर काढत असल्याने पोलिसांसमोर नव्हे आव्हान उभे ठाकले आहे. शनिवारी (दि. २१) सकाळी १०.४५ ते दुपारी ४ वाजेदरम्यान या दोन्ही घटना घडल्या. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नक्षत्रवाडीतीलच हिंदुस्तान आवास येथील वैदेही अपार्टमेंटमध्ये घर फोडीची घटना घडली. येथील रहिवासी वैशाली प्रल्हाद शिंदे (वय ३३) यांचे पती सकाळी नऊ वाजता कांचनवाडी येथील आपल्या फोटो स्टुडिओवर गेले. त्यानंतर वैशाली या मुलासह सकाळी पावणेअकरा वाजता घराला कुलूप लावून स्टुडिओवर मदतीसाठी गेल्या. दुपारी चार वाजता दाम्पत्य घरी परतले असता दरवाजाचे कुलूप गायब होते. चोरांनी घरातील लाकडी कपाटाचा दरवाजा व लॉकर तोडून सव्वा तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, ७ ग्रॅमचे कानातील झुंबर आणि २ ग्रॅमचे वेल असा ऐवज लंपास केला. तपास पोलीस हवालदार विठ्ठल राठोड करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वीच लग्न; तेच दागिने चोरांनी केले लंपास
  • नक्षत्रवाडीतील श्रीहरी नक्षत्र अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०६ मध्ये राहणारे खुशाल गोकुळ तुपे (वय २८) यांचे मे महिन्यात लग्न झाले. ते तिघे भाऊ याच अपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात. खुशाल हे वाळूज एमआयडीसीत कंपनीत नोकरीला आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता खुशाल हे कामावर गेले. त्यांची पत्नी संजना या सकाळी साडेअकराच्या सुमारास घराला बाहेरून कुलूप लावून आकाशवाणी चौकात मुलाखतीसाठी गेल्या.
  • अवघ्या तासाभरात म्हणजे दुपारी साडेबारा वाजता त्या परतल्या असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. चोरांनी बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून ४ ग्रॅमचे सोन्याचे फूल, ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र आणि ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार दिगंबर राठोड करीत आहेत.

Read About : Samruddhi Mahamarg Dial 112 Police Patrolling समृद्धीवर डायल ११२ ची दोन वाहने २४ तास फिरणार!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.