Advertisement Advertisement

Marathwada Water Crisis: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा

अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार – उद्योगमंत्री सामंत

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिबाबतही चर्चा झाली. मान्सूनच्या तीन महिन्यांत मोठ्याप्रमाणात पावसाचे खंड पडले आहेत. काहीकाळ पावसाचा खंड रहिल्यास ही स्थिती आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त आणि मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासमोर सादर केले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत सांगितले.

स्मार्ट सिटी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. यावेळी मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीवर चर्चा झाली. मराठवाड्यात पावसाचे खंड मोठ्या प्रमाणात झाले आहेत. ऑगस्टमध्ये तब्बल २६ दिवसांचा खंडकाळ आहे. हा खंड वाढल्यास खरिपाचे पिके वाया जाऊ शकतात. पिण्याच्या पाण्याचीदेखील स्थिती बिकट होऊ शकते. सध्या विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी विभागातील सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थिती अधिक वाईट होण्याची शक्यता विभागातील सर्व जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना सादर करणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

Leave a Comment

Leave a Reply