Ad Advertisement Ad Advertisement

MPSC Exam Reforms- एमपीएससी परीक्षांसाठी ओएमआर उत्तरपत्रिकांची छपाई

गट-क पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करा; व्ही. राधा समितीची शिफारस

मुंबई : MPSC Exam Reforms महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सध्याची प्रश्नपत्रिका निर्मितीची पद्धत रद्द करून प्रश्नपत्रिका आणि ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) उत्तरपत्रिकांची छपाई करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस उच्चस्तरीय समितीने राज्य सरकारला केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली एमपीएससी भरती व स्पर्धा परीक्षेतील सुधारणांसाठी ही उच्चस्तरीय समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकपदाची प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात दलालांसह आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही गजाआड व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली भरती परीक्षेतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने राज्यात सर्व महसुली विभागात जाऊन विविध संस्था, संघटना, स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणारे शिक्षक व संचालक यांच्यासह विद्यार्थ्यांशी चर्चा करून आपला अंतरिम अहवाल सरकारला सादर केला आहे..

परीक्षेतील पदसंख्येत वाढ

एमपीएससीच्या गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ या परीक्षेसाठी सुमारे १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले असून सद्यस्थितीत ५ हजारांहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागांकडून आणखी ११ हजारांहून अधिक पदांची मागणी आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. ही अतिरिक्त पदे शुद्धिपत्रकाद्वारे समाविष्ट करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

व्ही. राधा समितीच्या इतर प्रमुख शिफारशी
  • गट-क पूर्व परीक्षेच्या विद्यमान परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल न करणे
  • नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांचे मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकरच जाहीर करणे
  • खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित प्रक्रियेद्वारे नव्याने प्रश्नपत्रिका तयार करणे
  • प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांची छपाई, साठवणूक आणि वाहतूक यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे
  • परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करणे

Read About : Agniveer Service Extension to Six years – अग्निवीर आता 4 नव्हे 6 वर्षे नोकरी करणार

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.