ओपन-वेट एआय मॉडेल्समुळे संशोधन, प्रयोग आणि तंत्रज्ञान विकासाला मिळतेय चालना
लंडन : Open-Weight AI Models 2026 – कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सध्या ओपन-वेट प्रणालींची वेगाने भरभराट होत असून, या प्रणालींचे मुख्य तांत्रिक घटक कोणालाही डाऊनलोड करून आपल्या गरजेनुसार बदलता येतात. अशा मोकळ्या आणि लवचिक एआय मॉडेल्समुळे वैज्ञानिक प्रगतीला मोठी चालना मिळत असली, तरी त्यांच्या गैरवापराविरोधातील सुरक्षा उपाय अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे मोठे धोकेही निर्माण झाले आहेत. ब्रिटनच्या एआय सिक्युरिटी इन्स्टट्यिूटचे संशोधन संचालक यारीन गाल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधक स्टीफन कॅस्पर यांनी केली.
अलीकडच्या काळात चीनमधील मूनशॉट एआय कंपनीचे किमी-के२-इन्स्ट्रक्ट, झेड.एआयचे जीएलएम-४.५ आणि अमेरिकेतील ओपनएआयचे जीपीटी-ओएसएस यांसारख्या अत्याधुनिक ओपन-वेट प्रणाली बाजारात आल्या आहेत. सुरुवातीच्या चाचण्यांनुसार, या प्रणाली आजवरच्या सर्वात प्रगत ओपन-वेट प्रणाली ठरल्या असून, त्यांची कार्यक्षमता आघाडीच्या बंदिस्त व्यावसायिक एआय मॉडेल्सच्या बरोबरीची आहे.
या प्रणालींमुळे संशोधकांना कमी खर्चात नवनवीन प्रयोग करणे आणि पारदर्शकतेने एआयमधील त्रुटी तपासणे शक्य झाले आहे. मात्र, एकदा का एखादे मॉडेल ओपन-वेट स्वरूपात प्रसिद्ध झाले की, त्यावर निर्मात्यांचे नियंत्रण राहत नाही. हॅकर या मॉडेल्समधील सुरक्षा यंत्रणा सहजपणे काढून टाकू शकतात, ज्यामुळे सायबर हल्ले किंवा इतर घातक कामांसाठी त्यांचा वापर होण्याची भीती आहे. एकदा उघड झालेले मॉडेल पुन्हा मागे घेता येत नसल्याने, ते बाजारात आणण्यापूर्वीच त्याची सखोल सुरक्षा तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे एआय सेऊल समिटसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चर्चा झाल्याप्रमाणे, जबाबदार एआय विकासासाठी कठोर सुरक्षा चाचण्या आणि नियम तयार करणे काळाची गरज असल्याचे लेखकांनी नमूद केले आहे.
Read About : Ultimate Smile AI : आता दंतवैद्याकडे जाण्यापूर्वीच पाहा तुमचे भविष्यातील हास्य; अवघ्या 10 सेकंदांत मिळणार स्माईल प्रिव्ह्यू
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.