Ad Advertisement Ad Advertisement

Srikanth National Film Award : राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’चा डंका

राष्ट्रीय पुरस्काराने भुषण कुमारचा गौरव

मुंबई: Srikanth National Film Award : एखादं स्वप्न पाहणं सोपं असत, पण परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं ही खरी जिद्द, उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या प्रेरणादायी आयुष्याची कहाणी रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘श्रीकांत’ चित्रपटाने आता आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुजरातमधील एकता नगर, केवडिया येथे झालेल्या सोहळ्यात चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी पुरस्कार स्वीकारला. या सन्मानामुळे ‘श्रीकांत’च्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘हा अभिमानाचा क्षण’- भूषण कुमार

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भूषण कुमार यांनी हा क्षण अत्यंत अभिमानाचा असल्याचे सांगितले. श्रीकांत बोला यांची कथा पडद्यावर आणताना त्यांच्या जिद्दीने आणि परिस्थितीसमोर हार न मानण्याच्या वृत्तीने टीमला प्रेरणा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनीही श्रीकांत बोला यांची कहाणी केवळ अडचणींवर मात करण्याची कथा नसून, जगाला अशक्य वाटणारी स्वप्नं पाहण्याच्या धैर्याची कहाणी असल्याचे सांगितले.

राजकुमार रावने साकारली श्रीकांत बोला यांची भूमिका

या चित्रपटात राजकुमार राव यांनी श्रीकांत बोला यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. श्रीकांत बोला यांच्या खऱ्या आयुष्यावर प्रेरित असलेल्या या चित्रपटात त्यांच्या संघर्षापासून यशापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. मर्यादा कितीही असल्या तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठी स्वप्ने साकारता येतात, हा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे.

‘श्रीकांत’साठी आणखी एक मोठा सन्मान

चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा संपूर्ण टीमसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रेक्षकांपर्यंत एका असामान्य व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी पोहोचवणाऱ्या ‘श्रीकांत’ला आता राष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली आहे. रुपेरी पडद्यावरची प्रेरणादायी कहाणी आता राष्ट्रीय पुरस्कारामुळे आणखी खास ठरली आहे.

Read Also: National Film Awards: गुजरातमध्ये पुरस्कार सोहळा होण्यावर Paresh Rawal म्हणाले, “यात चुकीचे काय?”
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.