Ad Advertisement Ad Advertisement

जागतिक भूस्खलन संशोधनात भारत मोठी भुमिका बजावणार

जपानी तज्ञांनी व्यक्त केला विश्वास, वर्ल्ड लँडस्लाइड फोरमचा आज समारोप: २२ पासून सुरू होते मंथन, जागतिक परिषद प्रथमच भारतात, आधुनिक तंत्रज्ञान आणि पूर्वसूचना यंत्रणेवर भर

नवी दिल्ली : जागतिक भूस्खलन संशोधनात भारत मोठी भुमिका बजावणार – डोंगराला तडे जाण्यापासून ते अचानक दरड कोसळण्यापर्यंतच्या धोक्यांची माहिती वेळेत मिळाली, तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवे उपाय शोधत आहेत. या क्षेत्रात भारतही जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास जपानचे आपत्ती संशोधन तज्ञ प्रा. शिंजी सासा यांनी व्यक्त केला आहे.

फरीदाबाद येथील अमृता विश्व विद्यापीठममध्ये २२ पासून सुरू असलेल्या सातव्या जागतिक भुस्खलन परिषदेच्या पार्श्वभुमीवर ते बोतल होते. शुक्रवार दिनांक २७ रोजी या परिषदेचे सुप वाजले आहे. दरम्यान सातव्या ‘वर्ल्ड लँडस्लाईड फोरम’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतात प्रथमच या जागतिक परिषदेचे आयोजन होत आहे. यामुळे भूस्खलन संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारताचे योगदान वाढेल, असे प्रा. सासा यांनी सांगितले. ते जपानच्या पोर्ट अँड एअरपोर्ट रिसर्च इन्स्टट्यिूटमधील सॉइल डायनॅमिक्स ग्रुपचे प्रमुख आहेत.

दरड कोसळण्याआधीच मिळणार धोक्याची सूचना

या परिषदेत भूस्खलनाचा धोका ओळखणे, धोकादायक भागांचे नकाशे तयार करणे आणि पूर्वसूचना यंत्रणा विकसित करणे यावर विशेष चर्चा होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डोंगरांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. संभाव्य दुर्घटनेची माहिती वेळेत मिळाल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे शक्य होईल. रस्ते, पूल, रेल्वेमार्ग आणि इतर महत्त्वाच्या सुविधांचे संरक्षण करण्यावरही भर दिला जात आहे.

भारत-जपान सहकार्याला नवी दिशा

भूस्खलन संशोधनासाठी भारत आणि जपान यांच्यात सहकार्य वाढवण्याची मोठी संधी असल्याचे प्रा. सासा यांनी नमूद केले. ‘इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑन लँडस्लाईड्स’च्या माध्यमातून दोन्ही देशांतील तज्ञ संशोधन, अनुभव आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करू शकतात.

‘सुरक्षित आणि सक्षम समुदायांसाठी भूस्खलन विज्ञान व उपाययोजना’ ही परिषदेची मुख्य संकल्पना आहे. हवामान बदल, भूस्खलनाची कारणे, धोक्याचे मूल्यांकन आणि आपत्ती निवारण यावरही चर्चा होत आहे.

आपत्ती रोखता आली नाही, तरी जीव वाचवता येणार

भूस्खलन पूर्णपणे रोखणे शक्य नसले, तरी वैज्ञानिक संशोधन, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यातून होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. या परिषदेमुळे भारताला संशोधनाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळेल आणि जागतिक आपत्ती व्यवस्थापनात देशाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Read About: Microsoft Rocket AI Training System – एआय मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी मायक्रोसॉफ्टची ‘रॉकेट’ प्रणाली विकसित

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.